Home /News /entertainment /

Father Day 2020 : 'तुम्ही माझं आयुष्य पूर्णपणे बदललं', बाबा झाल्यावर करणचं मुलांसाठी हे खास पत्र

Father Day 2020 : 'तुम्ही माझं आयुष्य पूर्णपणे बदललं', बाबा झाल्यावर करणचं मुलांसाठी हे खास पत्र

2017 साली बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माला करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा बाबा झाला. 'सिंगल पॅरेंट' अ

    मुंबई, 20 जून : काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माला करण जोहर (Karan Johar)सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा बाबा झाला. रुही आणि यश अशी या दोन मुलांची नावं. करणचे त्याच्या मुलांबरोबरचे काही व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होत असतात. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मुलांसाठी लिहिलेलं खुले पत्र व्हायरल झाले होते. त्याने त्याच्या मुलांसाठी काय स्वप्न पाहिली आहे, याबाबत त्याने भाष्य या पत्रातून केले आहे. मुलांमुळे आयुष्य पूर्णपणे बदलले असं करण म्हणतो. सिंगल पॅरेंट म्हणून मुलांचा सांभाळ करणाऱ्यांसाठी हे पत्र नक्कीच वाचण्यासारखे आहे. र्प्रिय रुही आणि यश, जेव्हा तुमचा  जन्म झाला तेव्हा माझा वय 44 होतं आणि अगदी लगेचच तुमच्या येण्यामुळे मी  हॉलमार्कच्या ग्रीटिंग्स सारखा हळवा झालो. रुबाबात प्रत्येकाला जसं आपली मुलं वाटतात तसेच मलाही वाटे की किती अदभुत आहात तुम्ही दोघं , तुमच्या येण्याने माझ्या आयुष्यातली पोकळी भरून काढलीत आणि घराला घरपण दिलत, पण हे सत्य आहे. तुम्ही माझं आयुष्य पूर्णपणे बदलल आहात, आणि याबाबत मी कोणतीच तक्रार करत नाही आहे. आता मी याआधी करायचो त्याहीपेक्षा अधिक काळजी करू लागलो आहे- मला आता माझे इन्शूरन्स प्रीमियम, माझं मृत्यूपत्र, माझ्या संपत्तीची वाटणी याबाबत विचित्र विचार देखील येऊ लागले आहेत. कधीकधी मी रात्र रात्र या विचाराने जागा असतो की, जर मला काही झाले तर तुमच्यासाठी गार्डियन म्हणून कुणाची निवड करू. आता, माझ्यासाठी, तुम्ही काय किंवा कोण बनावे असे मला वाटते, हे विचार खूप दूर आहेत- त्याऐवजी मी माझे अस्तित्व आणि दीर्घायुष्याला अधिक महत्त्व दिले आहे. हे कदाचित स्वार्थी वाटेल पण मला मनापासून असे वाटते की, काही झाले तरीही मला शक्यतोवर तुमच्याबरोबर राहायचे आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा पहिली गोष्ट काय केली? मी जिममध्ये जायला लागलो आणि एक आहारतज्ज्ञाची देखील नेमणूक केली. सर्व निरोगी होण्यासाठी, म्हणून मी तुमच्या आजुबाजूलाच आहे. मला माहित आहे की जी एक गोष्ट मी तुम्हाला देणे लागतो, ते माझे जीवन आहे. म्हणून मी जेव्हा विचार करतो की, काय स्वप्ने आणि आकांक्षा तुमच्यासाठी  बाळगतो, तेव्हा माझे पहिले स्वप्न हेच आहे की शक्य तितक्या दूरपर्यंत तुमच्याबरोबर असायचे. अनेक लोकं मुलाला या जगामध्ये आणण्याच्या निर्णयाचे महत्त्व फार कमी लेखतात. तुमच्या दैनंदिन आयुष्याचा हा एक भाग असतो- तुमचं लग्न आणि तुम्ही जन्माला घालता. ही खूप साधी गोष्ट आहे. मात्र आजच्या दिवशी आणि काळात, जे शहरातील गोंधळ आणि व्यस्त वेळात्रकामुळे एखाद्याला त्यांचे स्वत:चेच आयुष्य सांभाळणे कठीण झाले आहे, त्यामुळे एखादं नवीन आयुष्य या जगात आणणे हा मोठा निर्णय आहे. पण मला ते आतून जाणवलं, मला माहित होतं की मी तयार आहे- मला उत्तमरित्या माहित असलेल्या सर्वात चांगल्या मार्गाने तुमचं पालनपोषण करण्यासाठी. प्रत्येक कानाकोपऱ्यात किंवा विविध ठिकाणी पालकत्वाचे सल्ले उपलब्ध आहेत- अगदी बाळासाठी दुधासाठी काय सूत्र वापरावे त्यापासून ते  ढेकर कशी काढावी यापर्यंत. काही मावश्या आणि काकांनी कार्यभ्यास करून पाळणा बनवला, तर काही सुस्पष्ट होते बाळाची उशी किती मऊ असावी. मी सगळ्यांचा सल्ला ऐकत होतो परंतु मी एकटा पालक असल्याने मीच माझा मार्ग शोधून काढत असे, तुमचा बाबा बनण्याचा माझा मार्ग. मी जास्त माझ्या आतल्या आवाजावर विसंबायला शिकत आहे आणि एक वडील बनण्याबरोबर वाटणारी भीती आणि असुरक्षितता स्वीकारायला मी शिकत आहे. तुमचा शाळेचा पहिला दिवस, तुमचे पहिले शब्द आणि अगदी माझ्याबद्दल तुमची पहिली पोचपावती यासारख्या गोष्टींची मी आधीच कल्पना करणे सुरू केले आहे. खरं सांगायचं तर मी प्रत्येक दिवशी तुझ्या कानात 'पापा, पापा, पापा' कुजबूजत असतो, कारण मला खात्री आहे की तुमचे पहिले शब्द मल्याळममध्ये असतील (आमच्या चारही परिचारिका केरळच्या आहेत)! तुमच्यासाठी जे दुसरे स्वप्न मी पाहिले आहे ते म्हणजे, आश्चर्यकारकरित्या, अशांसाठी एक प्रतिक्रिया आहे जे मला विचारतात की, 'तुझी मुलं तुझा वारसा चालवतील का?'  मी आता जे काही करतो आहे त्याकरता माझ्या वडिलांनी कधी मला सक्ती केली नव्हती. खरंतर, मी जे काही आता करतो आहे, ते मी करू नये असं त्यांना वाटायचे. मी इंडस्ट्रीतून बाहेर पडावे अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे माझी एखादी कंपनी आहे आणि मी एक वारसा निर्माण केला आहे याकरता तुम्ही देखील अपेक्षित आहे हेच करावे अशी माझी इच्छा नाही. तुम्हाला चित्रपट व्यवसायाकडे वळायचे नसेल तर माझी कंपनी देखील तुम्ही पुढे नेण्याची गरज नाही. त्याऐवजी माझी अशी इच्छा आहे की, मी तुम्हाला अशी माणसं बनवेन जे त्यांच्या निवडी, मतं आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत स्वतंत्र आहेत. मला मिळालेलं स्वातंत्र्य हाच वारसा मला तुम्हालाही द्यायचा आहे. यावर्षाच्या सुरूवातीला मी सद्गुरूंच्या एका व्याख्यानासाठी उपस्थित होतो, त्यांनी सांगितलेली एक खूप सुंदर गोष्ट अजूनही माझ्याबरोबर आहे. ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या मुलीला कोणतेही ज्ञान न देता वाढवले आहे. त्यांनी तिला काहीच शिकवले नाही- जे काही ती शिकली ते आजुबाजूच्या पर्यावरणाकडूनच. माझ्या मुलांनी देखील हेच करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सध्या उपलब्ध असलेल्या ज्ञानाने अनुपालन करावे अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे माझी तिसरी आशा अशी आहे की, तुम्ही असं कधीच वाटून घेऊ नका की तुम्हाला परंपरांचे अनुसरण करणे गरजेचे आहे. तुम्हाला सांगण्यात येईल म्हणून तुम्ही धार्मिक असणेही गरजेचे नाही आहे किवा अध्यात्म Cool आहे म्हणून त्याच्याकडेही वळू नका. लोकांना जे योग्य वाटते तसं तुम्ही वागावे असे मला वाटत नाही. मला तुम्ही मोठे व्हावे आणि तुमची श्रद्धा मिळवा. मला असं वाटत नाही तुमची काळजी घेण्यासाठी कोणती नियमावली आहे, पण मला विश्वास आहे माझ्याकडे माझी स्वत:ची अशी काही मजबूत मूल्य आहेत, जी आपल्या घरामध्ये (आणि आपल्या आयुष्यात) मुलभूतरित्या आत्मसात केली जातील. शेवटी, मला नाही माहित तुमचा प्रवास मला कधीपर्यंत पाहता येईल, पण तुम्ही एक गोष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे- लक्षात ठेवा. मी हे कायम लक्षात ठेवले की माझ्या वडिलांनी काय केले आणि ते कोण होते. मी माझ्या आईबरोबर राहतो आणि ती जे काही बोलते आणि नाही बोलत ते सर्व पाहायला मला आवडते. तुम्ही दोघांनीही अखेरीस हे लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. प्रेम, पापा
    First published:

    Tags: Fathers day 2020, Karan Johar

    पुढील बातम्या