Home /News /entertainment /

‘दान नको मला काम द्या’; बेरोजगार बॉक्सरची अवस्था पाहून फरहान अख्तर झाला भावूक

‘दान नको मला काम द्या’; बेरोजगार बॉक्सरची अवस्था पाहून फरहान अख्तर झाला भावूक

पाच वर्ष भारतीय लष्कराच्या बॉक्सिंग संघांचे प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पंजाब विद्यापीठाचे प्रतिनिधित्वही केले होते. १९८०च्या उत्तरार्धात ते राष्ट्रीय क्रीडा संस्था (National Institute of Sports)पटियालाचे विद्यार्थी होते.

पुढे वाचा ...
    मुंबई 16 एप्रिल: सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग चॅम्पियन आबिद खान (boxing champion Abid Khan) उपजीविकेसाठी मालवाहू टेम्पो चालवत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे सरकारचे भारतीय खेळाडूंकडे दुर्लक्ष आणि त्यामुळे या खेळाडूंवर ओढवलेली वेळ या बद्दल नेटकरी चर्चा करत आहेत. आबिद खान यांचा हा व्हिडीओ युट्यूबवर 'स्पोर्ट्स गांव' (Sports Gaon)नावाच्या चॅनलने शेअर केला होता. यात उत्तर भारतातील माजी बॉक्सिंग चॅम्पियन आबिद खान यांची कथा सांगण्यात आली आहे. आबिद खान यांनी आजपर्यंत अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं असून ते पाच वर्ष भारतीय लष्कराच्या बॉक्सिंग संघांचे प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पंजाब विद्यापीठाचे प्रतिनिधित्वही केले होते. १९८०च्या उत्तरार्धात ते राष्ट्रीय क्रीडा संस्था (National Institute of Sports) पटियालाचे विद्यार्थी होते. एवढं सगळं नीट सुरू असताना मात्र आर्थिक अडचणींमुळे आबिद खान यांना मालवाहू टेम्पो चालविण्यासह जगण्यासाठी इतर अनेक कामं करावी लागली. या व्हायरल व्हिडिओमध्ये आबिद त्यांच्यावर ओढवलेल्याअडचणींबद्दल सांगतात. राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू असूनही नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागल्याचे ते सांगतात. स्वतःवर अशी दुर्दैवी वेळ आल्याने त्यांनी आपल्या मुलांनाही खेळात भाग घेण्यापासून रोखले. मुलांना शिकवण्यासाठी पुन्हा प्रशिक्षक होण्याची आबिद यांची इच्छाआहे. क्रीडा पत्रकार (Sports journalist) सौरभ दुग्गाव यांनीही ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला. त्यांनी सांगितले,की आबिद खान कोणतीही आर्थिक मदत स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांना फक्त पुन्हा प्रशिक्षक व्हायचेआहे. दरम्यान,आबिद यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक जणांनी शेअर केला आहे. अभिनेता फरहान अख्तरनेही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या खेळाडूला आपली महत्त्वकांक्षा सोडून जगण्यासाठी इतर काम करावं लागणं हेअतिशय हृदयद्रावक आहे. याच्याशी संपर्क साधण्याची माहिती तुम्ही देऊ शकाल का? असे फरहानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर, आशुतोष नावाच्या एका नेटकऱ्याने म्हटलंय की, 'मध्यमवर्गीय खेळाडूंना भारत स्थान नाही. आपलं आयुष्य खेळासाठी समर्पित केलेल्या माझ्या अनेक सहकाऱ्यांकडे नोकरी नाही. त्यामुळे मी पदवीनंतर खेळणं थांबवलं आणि नोकरी मिळवली.आबिद खान कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे मी समजू शकतो. आबिद खान हे एका बॉक्सरप्रमाणेच जगले, आणि त्याचप्रमाणे लढत ते मृत्यूला सामोरे जातील,' असेही आशुतोष म्हणतो. काही युझर्सनी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि क्रीडा मंत्रालयाला टॅग करून आबिद यांना मदत करण्याची मागणी केली आहे. 'आबिदयांच्यावर अशी वेळ ओढवणं खरंच खूप वाईट आहे. किरेन रिजिजू यांनी आपल्या देशातील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी अशा प्रतिभावान लोकांची मदत घेतलीपाहिजे,'असं एका ट्विटरकराने म्हटले आहे.
    First published:

    Tags: Abid khan, Bollywood, Bollywood News, Boxer, Boxing champion, Farhan akhtar, Workout

    पुढील बातम्या