मुंबई, 17 फेब्रुवारी- झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या मंडळींनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. या शोमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतीच हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात हजेरी लावली. अमृता फडणवीय यांची गाण्याची आवड सर्वांना माहितीच आहे. या कार्यक्रमात देखील त्यांना त्यांच्या व देवेंद्र फडणवीस यांच्या आवडत्या गाण्याविषयी विचारले जाते. यावेळी त्यांनी आवडत्या गाण्याविषयी कर सांगितलेच शिवाय त्या त्यांच्यासाठी कसं गाणं म्हणतात याचं देखील मजेदार उत्तर दिलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. झी मराठीने नुकताच किचन कल्लाकारच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमृता फडणवीय यांना शोचा होस्ट संकर्षण कऱ्हाडे गाण्याबद्दल प्रश्न विचारतो. तो म्हणतो की, तुम्हच्या दोघांच्या आवडते गाणं कोणत? यावर त्या म्हणल्या की, पिया तू अभ तू आजा.. ते मला हे गाणं सारखं म्हणायला लावयचे. त्यातील फक्त मोनिका ओ माय डार्लिंग असं ते म्हणयाचे..तेव्हा मी त्यांना म्हणायचे अमृता ओ माय डार्लिंग..असं म्हणा म्हणायचे..यावेळी संकर्षण म्हणतो की, तुम्ही त्यांनी असं हातात झारा घेऊन म्हणायचा का? यावर त्या एकदम मजेदार उत्तर देतात. त्या म्हणतात असं नाही पण, मी लाटणं घेऊन म्हणायचे. यावर संकर्षण म्हणतो आता बास…माझ्या मनात एकही प्रश्न उरलेला नाही.
यासोबत यावेळी त्याने एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं होतं. या प्रश्नानंत त्यांना लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर अम-ता फडणवीस यांनी दिलं. पुरणपोळीच्या प्रश्नावरून काहींनी अमृता यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले होतं. वाचा- ‘तुझ्या माझ्या संसाराला..’ मधील या अभिनेत्रीचा मालिकेला रामराम या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर हे कलाकार सहभागी झाले आहेत.