मुंबई, 06 डिसेंबर : सध्या देशभरात महिलांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच एका अभिनेत्रीनंही एका रोड रोमिओनं तिचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला केल्याचा अनुभव शेअर केला होता. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आणि सुपर मॉडेल शिबानी दांडेकर हिने सुद्धा तिच्या सोबत नुकतीच घडलेली एक घटना शेअर केली ज्यामुळे तिच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. जी तिनं याआधी कधीच जाणवली नव्हती. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखातीत शिबानी म्हणाली, आपण रोज वाचतो, ऐकतो की आज एका महिलेसोबत, मुलीसोबत गैरवर्तन झालं किंवा बलात्कार झाला किंवा कोणाची हत्या करण्यात आली. हे खूप भयंकर, निंदनीय आणि भीतीदायक आहे. मला अनेकदा समजत नाही की हे सर्व काय होत आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण कुठे जात आहोत. कानातून रक्त वाहत असूनही ऐश्वर्यानं पूर्ण केलं शूटिंग, वाचा संपूर्ण किस्सा
शिबानी पुढे म्हणाली, काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत एक घटना घडली. तेव्हा माझ्या मनात जेवढी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली जेवढी मी मुंबईमध्ये राहायला आल्यापासून आतापर्यंत कधीच झाली नव्हती. काही आठवड्यांपूर्वी मी मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर आले. आजूबाजूला पाहिलं मला माझी कार सापडत नव्हती. ही गोष्ट रात्रीची नाही तर दिवसाची आहे. त्यावेळी मला रस्त्यावर चालण्याचीही भीती वाटत होती. त्यावरुन मला एक गोष्ट जाणवली की रोज अनेक महिला या भीतीतून कशा जात असतील. हे सर्व कसं सहन करत असतील. संजय दत्तने संगितली तुरुंगातील शिक्षा कमी करण्याची युक्ती, पाहा VIDEO
शिबानी सांगते, आपण आपल्या घरात, आपल्या देशात, आपल्या मातीत कुठेच सुरक्षित नाही. महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. ज्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही. काही दिवसांपूर्वीच फरहान अख्तर आणि शिबानीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात ते क्रायोथेरेपी ट्रीटमेंट घेताना दिसले होते. हे फोटो शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. अर्जुननं शेअर केला ‘पानीपत’चा BTS VIDEO, चर्चा मलायकाच्या कमेंटची!