मुंबई, 14 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान (fardeen khan comeback) जवळपास 11 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तो ‘विस्फोट’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध चेहरे दिसणार आहेत. या चित्रपटात फरदीन खान सोबत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख( riteish deshmukh)आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या तिघांनाही एका स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियाने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘विस्फोट’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘एक निर्माता म्हणून मी नेहमी एका वेगळ्या विषयाच्या शोधात असतो. आणि विस्फोट हा चित्रपट थोडा वेगळा आहे.
View this post on Instagram
प्रिया बापटला यानिमित्त बॉलिवू़डमधील एका मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच रितेश देशमुखसोबत देखील प्रिया बापट पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने मराठीतील दोन लोकप्रिय कलाकर एकत्र आल्याचे पाहायला मिळणार आहे.
वाचा : बॉलिवूडची बोल्ड क्वीन Malaika Aroraसोबत घडला 'Oops Moment'; फोटो झाले VIRAL
यासोबतच प्रिया बापटने अभिनेता संजय दत्तसोबत देखील मुन्ना भाई एमबीबीएस या सिनेमात स्कीन शेअर केली होती. या सिनेमात प्रियाच्या भूमिकेचे व अभिनयाचे कौतुक झाले होते. आता देखील प्रियाला फरदीन खानसोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
वाचा : Video : 35 तासांची मेहनत आणि... असा चित्रित झाला 'मन उडू उडू झालं' चा Navratr Special भाग
विस्फोट या चित्रपटातून फरदीन खान जवळपास 11 वर्षांनंतर बॉलिवू़डमध्ये कमबॅक करत आहे. यापूर्वी तो 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो चित्रपटसृष्टीपासून लांब होता. आता हा चित्रपट फरदीनला बॉलिवूडमध्ये पुन्हा स्थान निर्माण करण्यात यशस्वी करणार का याची उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Fardeen Khan, Priya bapat, Ritesh deshmukh