मुंबई, 14 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' ( man udu udu jhala)सध्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरलेली आहे. लवकरचं या मालिकेत नवरात्र स्पेशल भाग ( man udu udu jhala navaratri special episode)दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील कलाकार ऋता दुर्गुळे (hruta durgule )हिने चाहत्यांसोबत मालिकेच्या चित्रीकरणाचा एक भाग शेअर केला आहे. यासोबत नवरात्र स्पेशल भाग चित्रित करण्यासाठी सगळ्यांनाच तब्बल किती तास अथक मेहनत करायला लागल्याचा अनुभव देखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
ऋताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मालिकेच्या नवरात्री स्पेशल भागाच्या चित्रीकरणा दरम्यानचा आहे. व्हिडिओमध्ये हा भाग चित्रित करण्यासाठी घेण्यात आलेली सगळी मेहनत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत ऋताने म्हटले आहे की, ' 35तासांचं चित्रीकरण हे असं असतं. वेगवेगळ्या शिफ्ट, मेकअप रूमची व्यवस्था नाही, अतिउत्साहीत लोक, पण शेवटी जेव्हा तुम्ही या सगळ्याचा परिणाम बघता तेव्हा तुम्ही तुमचा सगळा थकवा विसरून जाता. काहीतरी सुंदर तयार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मेहनत करणं गरजेचं आहे. मी लेखकांचे आभार मानते ज्यांनी हे उत्कृष्ट सीन लिहिले. यासोबतच कॅमेरामन आणि दिग्दर्शकाच्या मेहनतीला सलाम. आम्हाला सगळं साहित्य पुरवणाऱ्या निर्मात्यांच्या टीमला धन्यवाद.
View this post on Instagram
तसेच ऋता पुढे म्हणतेय की, मला 'मन उडू उडू झालं' या मालिकेचा भाग असल्याचा अभिमान वाटत आहे. आमच्या मालिकेवर इतकं प्रचंड प्रेम केल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार..' नवरात्र विशेष भागात दिपू आणि अजिंक्य गरबा खेळताना दिसणार आहेत. या विशेष भागाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादासाठी 'मन उडू उडू झालं' ची संपूर्ण टीम उत्साहात आहे.
वाचा : Bigg Boss मराठीच्या घरात पाहायला मिळणार विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा Photos
आता प्रेक्षकांना देखील हा भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह दिसत आहे. त्याप्रमाणे छोटा पडदा देखील नवरात्रीच्या उत्सवात रंगून गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial