मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तू आहेस तरी कोण?', एका ट्वीटमुळे सोनू सूद सोशल मीडियावर होतोय ट्रोल

'तू आहेस तरी कोण?', एका ट्वीटमुळे सोनू सूद सोशल मीडियावर होतोय ट्रोल

ज्या सोशल मीडियावर आतापर्यंत सोनू सूदचं (sonu sood) कौतुक केलं जात होतं, तिथंच आज त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे.

ज्या सोशल मीडियावर आतापर्यंत सोनू सूदचं (sonu sood) कौतुक केलं जात होतं, तिथंच आज त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे.

ज्या सोशल मीडियावर आतापर्यंत सोनू सूदचं (sonu sood) कौतुक केलं जात होतं, तिथंच आज त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे.

  • Published by:  news18 desk

मुंबई, 11 मार्च : लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कित्येकांसाठी देवदूत ठरला. तेव्हापासून त्याने मदतीसाठी आपला हात पुढे केला तो अजूनही अनेकांना मदत करतोच आहे. कठिण प्रसंगात गरजूंसाठी धावून आलेल्या सोनू सूदचं सोशल मीडियावरही खूप कौतुक झालं. पण आज त्याच सोशल मीडियावर तो ट्रोल होतो आहे आणि यासाठी कारण ठरलं ते सोनूचं एक ट्वीट.

'महाशिवरात्री'च्या निमित्ताने सोनू सूदनं एक ट्वीट केलं. पण हे ट्वीट पाहिल्यानंतर सोनूवर नेटिझन्स भडकले आहेत. ट्विटरवर #WhoTheHellAreUSonuSood  हॅशटॅग वापरून सोनू सूदला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.

‘ महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी फक्त भगवान शंकराचे फोटो फॉरवर्ड करून नाही तर एखाद्याची मदत करून ही महाशिवरात्री साजरी करा. ओम नमः शिवाय.' असं ट्वीट सोनू सूदनं केलं.  खूप लोकांनी त्याच्या या ट्वीटवर कमेंट्स करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

हे वाचा - अभिनेत्यानं उडवली शाहरुखची खिल्ली; प्रदर्शनापूर्वीच ‘पठाण’ची पटकथा केली लीक

हिंदू धर्माबद्दल आम्हाला अक्कल शिकवणारा कोण? असा प्रश्न त्याला विचारला जातो आहे.

अमिताभ बच्चन यांनी सुद्धा दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा:

तसंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2021) शुभेच्छा देत ट्वीट केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, 'शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव शाश्वत आहेत, शिव भगवंत आहेत! शिव ओंकार आहेत, शिव ब्रह्म आहेत, शिव शक्ती आहेत, शिव भक्ती आहेत !! लोककलांचा पवित्र उत्सव, महाशिवरात्रीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा! भगवान शिवचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील.’

हे वाचा -  ‘स्टार किड्स असणं हा शाप की वरदान?’; घराणेशाहीच्या वादात जान्हवी कपूरची उडी

अनेक बॉलिवूड कलाकारांनीही महाशिवरात्री निमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Sonu Sood, Twitter