SSR Death: 13 आणि 14 जूनच्या रात्री नेमकं काय झालं? त्या तिघांना घेऊन CBI पुन्हा सुशांतच्या घरी

SSR Death: 13 आणि 14 जूनच्या रात्री नेमकं काय झालं? त्या तिघांना घेऊन CBI पुन्हा सुशांतच्या घरी

हे तिघेही जण 14 जूनला सुशांतसोबतच होते. त्यामुळे त्यांच्याकडून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 23 ऑगस्ट: CBIने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी वेगात सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये CBIची टीम अनेकदा सुशांतच्या घरी घरी गेली असून सर्व कंगोरे तपासून पाहात आहे. रविवारी पुन्हा एकदा CBIची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. त्यावेळी त्यांच्यासोबत तीन खास माणसं होती. यात सुशांतचा कुक नीरज, हाऊस मॅनेजर दीपेश सावंत आणि त्याचा रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी यांचा समावेश आहे. सीबीआय 13 आणि 14 जूनला नेमकं सुशांतच्या घरात काय घडलं याची माहिती घेत आहे.

हे तिघेही जण 14 जूनला सुशांतसोबतच होते. त्यामुळे त्यांच्याकडून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला परवानगी दिली होती.

शनिवारी सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुशांतच्या घरात पाय टाकताच CBIचे अधिकारी बुचकळ्यात, जवळपास सर्व वस्तू गायब

पाच डॉक्टरांच्या टीमने हा रिपोर्ट लिहिला आहे. रिपोर्टनुसार, सुशांतच्या गळ्यावर 33 सेमी लांब एक खूण होती. त्याची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.

वकिलांनी उपस्थित केले प्रश्न

रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब एक खूण होती. दोरीची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हत्या की आत्महत्या? CBI पोहोचली सुशांतच्या घरी, क्राईम सीन करणार रिक्रिएट

सीबीआयने दिल्लीतील  एम्सच्या डॉक्टरांची मदत घेऊन पास्टमार्टम अहवालाची तपासणी केली. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, याआधी केलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नव्हता. विकास सिंह म्हणाले की, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुशांतचा पास्टरमॉर्टम योग्य नव्हता की रिपोर्ट योग्यरित्या लिहिला गेला नाही. सीबीआयच्या तपासणीत सर्व काही स्पष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 23, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या