• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • करीनाला चुकून लागला फॅन्सचा धक्का आणि मॅडम एवढ्या भडकल्या...., जुना VIDEO व्हायरल

करीनाला चुकून लागला फॅन्सचा धक्का आणि मॅडम एवढ्या भडकल्या...., जुना VIDEO व्हायरल

करीनाचा एक जून व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका पर्टीतून ती गडबडीत बाहेर पडत असताना एक तिची फॅन तिला येऊन धडकते. मग काय करीना रागाने लाला झाली व काहीशी चिडलेली दिसली.

 • Share this:
  मुंबई,3 नोव्हेंबर- बॉलिवूड कलाकारांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. शेवटी चाहता वर्ग कुणाल आवडत नाही. सेलेब्स देखील चाहत्यांना कधीच विसरत नाहीत. वेळोवेळी त्यांचे आभार मानत असतात. मात्र कधी कधी त्यांना फॅन्समुळे त्रास देखील होतो. अनेकवेळा पब्लिक प्लेसमध्ये सेलेब्स फॅन्सवर चिडलेले पाहायला देखील मिळतात. करीना कपूरसोबत (Kareena Kapoor Khan) देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. करीनाला अनेकवेळा स्पॉट करण्यात आलं आहे. ती पोज देते आणि निघून जाते. विेशेषकरून ती कधी फॅन्ससोबत सेल्फी किंवा फोटो काढताना दिसत नाही. करीनाचा एक जून व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका पर्टीतून ती गडबडीत बाहेर पडत असताना एक तिची फॅन तिला येऊन धडकते. मग काय करीना रागाने लाला झाली व काहीशी चिडलेली दिसली. तिचा हा व्हिडीओ 2020 (fan pushes Kareena Kapoor old video viral) चा आहे. होळी पार्टीचा हा व्हिडीओ आहे. सध्या यूट्यूबवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाचा : 'वडील सैफ देतात शिव्या आणि आई अमृता सिंह चालवते पॉर्न साइट', सारा अली खानचा.... व्हिडीओl करीना रागावल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, करीना गेटमधून बाहेर येते आणि कॅमेऱ्यांसमोर पोज देण्यास सुरुवात करते. तेवढ्यात मागून येणारी एक चाहती चुकून करीनाला धडकते. ती लगेच करीनाला सॉरी म्हणते, पण करीना तिला शिव्या देऊ लागते. मात्र, नंतर ती त्या चाहतीसोबत फोटो क्लिक करते. पण यादरम्यान करीना रागावते आणि लगेच तिथून निघून जाते. यूट्यूबवर हा व्हिडीओ पाहून लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत आणि संताप व्यक्त करत आहेत. काही लोक करीना कपूरवर टीका करत आहेत, तर काहीजण अशा चाहत्यांवरही टीका करत आहेत जे काही भावना नसतानाही सेल्फी किंवा फोटोसाठी स्टार्सच्या मागे धावतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published: