मुंबई 13 ऑगस्ट : प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) सध्या चांगलाच चर्चेत आहेत. अतिशय महागडा आणि लक्झरीयस ब्रँड म्हणून सब्यासाची ओळख आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी ते प्रसिद्ध उद्योगपती अनेक श्रीमंत लोक सब्यासाचीचे कपडे परिधान करतात. त्यामुळे प्रत्येक मुलीला तिच्या लग्नासाठी सब्यासाचीचेच कपडे असावेत अशी इच्छा देखील आहे. पण या कपड्यांची किंमत सर्व सामान्यांच्या अवाक्या बाहेरची आहे. पण सध्या हाच प्रसिद्ध कपड्यांचा ब्रँड ट्रोल होताना दिसत आहे. दरम्यान झालं असं की, सेलिब्रिटींप्रमाणे सामान्य मुलींना ही सब्यासाची कपडे घालण्याचा मोह होऊ लागला व ही मागणी अतिशय वाढू लागली. हाच मुद्दा लक्षात घेता सामान्यांना परवडतील अशा दराने कपडे बनवण्याचा निर्णय ब्रँड ने घेतला त्यासाठी H&M या ब्रँड शी हातमिळवणी करण्यात आली. आणि काही स्वस्त दरात डिझाईन्स बनवण्यात आल्या. त्यांनी वंडरलस्ट या थीम वर काही डिझाईन्स केल्या. नुकतंच या नव्या शैलीच प्रदर्शन झालं. मात्र या नंतर त्यांना चांगलाच ट्रोल केलं जातं आहे.
Sridevi Birth Anniversary : श्रीदेवींच्या आईला पसंत नव्हते बोनी कपूर, मिथुन चक्रवर्तींसोबतचं अफेयर ठरलेलं वादग्रस्तसब्यासाचीने बनवलेल्या या डिझाईन्स भारतीय वेशातील काही डिझाईन्स नव्याने सादर केल्या. आणि परवडणारी किंमत म्हटली तरी एका मोठ्या ब्रँडला साजेशीच आहे. त्यामुळे यावर नेतकऱ्यांनी त्यांना फारच ट्रोल केलं आहे. सर्वात आधी त्यांनी काही साड्यांच्या डिझाइन्स प्रदर्शित केल्या. यातील एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यात म्हटलं आहे. ‘माझ्या आजीकडे 70 च्या दशकात अशीच साडी होती. पण त्यासाठी किडनी विकावी लागत नव्हती.’
तर कोणी या साडीची इंग्लिश विंगलीश मधील श्रीदेवी यांच्या साडीशी केली.
Its giving me Sridevi from English Vinglish vibes pic.twitter.com/vLsT4lGX5B
— Emi.ly (@Emi6289) August 11, 2021
साड्याच नव्हे तर ज्वेलरी, चपला, बेल्ट अश्या वस्तुही याखेरीज पुरुषांचे कपडे ही त्यांनी लाँच केले आहेत. तर ते ही पाहून नेटिझनसना हसू आवरता आल नाही. तर त्यावर ही ट्रोलिंग सुरू झालं आहे.
कोणी या कपड्यांना ड्रायव्हर चे कपडे म्हटलं तर कोणी वॉचमनचे. तर त्यांची किंमत पाहूनही काहीजण थक्क झाले.
sabyasachi x h&m is so embarrassing ain’t no way it’s gonna cost $70 to look like an Indian bus driver pic.twitter.com/j2BW1Sba38
— neha 🌿 (@nehadantuluri) August 10, 2021
दरम्यान सब्यासाची हा अतिशय महागडा कपड्यांचा ब्रँड आहे. लाखो रुपयांना या ब्रँड ची एक साडी विकली जाते. अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी या ब्रँडचे कपडे परिधान करतात. बिपाशा बासू, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा या अभिनेत्रींनी आपल्या लग्नात याचं डिझायनर चे कपडे परिधान केले होते.