• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ... म्हणून मामा ग्रेट! वाचा अशोक सराफ यांचा भावुक करणारा किस्सा

... म्हणून मामा ग्रेट! वाचा अशोक सराफ यांचा भावुक करणारा किस्सा

काही वर्षांपूर्वी ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचं तालीम सुरु होतं तेव्हाचा हा किस्सा आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 सप्टेंबर-  मराठी (Marathi Actor) चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. ते का एक ग्रेट अभिनेता आहेत. हे आपल्याला समजेल. आज आपण त्यांचा एक असा किस्सा वाचणार आहोत. ज्यामुळे त्याची आपल्या कामावरती असलेली निष्ठा दिसून येईल. मामांनी चित्रपटांसोबतचं अनेक नाटकांमध्येसुद्धा काम केल आहे. मामा एक उत्तम कलाकार आहेत, हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र मामा एक उत्तम माणूससुद्धा आहेत. आणि ते सतत इतरांचा विचार आधी करतात, हे आपल्याला समजून येईल. काही वर्षांपूर्वी ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचं तालीम सुरु होतं तेव्हाचा हा किस्सा आहे. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाची तालीम अगदी शेवटच्या टप्प्यावर आली होती. त्यामुळे सर्वच कलाकार अगदी जोमाने तयारी करत होते. (हे वाचा:सुबोधचा बाप्पा आहे खास; अभिनेत्याने घरी केला ऑलिम्पिकचा देखावा) मामासुद्धा आपल्या नेहमीच्या उत्सहाने तालीम करत होते. मात्र एकेदिवशी अचानक त्यांच्यामध्ये थोडासा बदल जाणवू लागला. आणि ही गोष्ट हेरली नाटकाचे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी. मात्र अनेकवेळा विचारणा करूनसुद्धा मामांनी नेमकं कारण नाही सांगितल. मामा तसचं आपला सराव करत राहिले. मात्र चिन्मयने मामांच्या ड्रायव्हरला याबद्दल विचारलं आणि तेव्हा त्याला समजलं, की मामांच्या मानेपासून पाठीत एक मोठी कळ आली होती.आणि त्यामुळे मामांची मान खूपच दुखत आहे. त्यांना खुपचं वेदना होतं आहेत. तसेच मामांना वरचेवर असं होतं, म्हणून ते आपल्या सोबत एक बाम ठेवतात. (हे वाचा:नाईकांच्या वाड्यात बाप्पा झाले विराजमान; मात्र आनंदात येणार दत्ता नावाचं विघ्न) मात्र हा बाम असूनसुद्धा त्यांनी त्याचा वापर केला नव्हता. याबद्दल मामांना विचारलं असता, त्यांनी थक्क करणारं कारण सांगितलं. मामा म्हणाले, ‘माझ्याजवळ जो बाम आहे, त्याला खुपचं उग्र असा वास आहे. आणि इथे तालीम करणाऱ्या सर्व कलाकारांना त्याचा वास सहन होणार नाही. त्यांना तो वास सहन करत आपलं काम करावं लागेल. त्यांना विनाकारण त्याचा त्रास होईल. म्हणून मी तो बाम लावायचं टाळलं’. अशोक सराफ यांचं हे उत्तर ऐकून सर्वचजण थक्क झाले होते. कारण स्वतःला वेदना होतं असताना इतरांचा विचार करणारा माणूस किती निस्वार्थी आणि थोर असू शकतो. म्हणूनचं मामा एक उत्तम कलाकारासोबत एक थोर माणूससुद्धा आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: