मुंबई, 6 ऑगस्ट- मनोरंजनसृष्टीत सध्या एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी घडत आहेत. चित्रपट निर्माता विभू अग्रवालला(Vibhu Agrwal) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने त्यांना अटक झाली आहे. ही माहिती समोर येताच मनोरंजनसृष्टीत एकचं खळबळ माजली आहे. त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभू अग्रवालसोबतचं त्यांच्या कंपनीची कंट्री हेड अंजली रैनावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | Police have registered a case against Vibhu Agrawal, the CEO of film production company Ullu Digital Pvt Ltd for allegedly sexually harassing a woman, under Section 354 of IPC in Mumbai. Anjali Raina, the company's country head has also been booked: Mumbai Police
— ANI (@ANI) August 5, 2021
विभू अग्रवाल यांच्या कंपनीचं नाव उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. ही कंपनी अडल्ट कंटेंट बनवण्यासाठी ओळखली जाते. वृत्तसंस्था ANIने याबद्दलचं एक ट्वीटसुद्धा केलं आहे. त्यामध्ये विभू अग्रवाल आणि अंजली रैनावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप करत गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे.
(हे वाचा: फरहान अख्तरने पुरुष नाही तर महिला हॉकी टीमला दिल्या शुभेच्छा;नेटकऱ्यांनी धरलं..)
याबद्दल सांगताना मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे, ‘उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या CEO विभू अग्रवालला आयपीसी कलम 354 नुसार लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच विभू अग्रवालसोबतचं कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभू अग्रवालने 2013 मध्ये ‘बात बन गयी’ ची निर्मिती केली होती. त्यानंतर 2019मध्ये त्यांनी उल्लू ऍप लॉन्च केला होता. यावर हिंदी इंग्लिशमधील बोल्ड कंटेंट दाखवला जातो. फक्त हिंदी इंग्लिशचं नव्हे तर भोजपुरी, तमिळ, तेलुगु, मराठी पंजाबी अशा विविध भाषांमधील बोल्ड कंटेंट दाखवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News