मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte;‘त्या’ न्यूड सीनमुळे होतेय ट्रोल;

ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte;‘त्या’ न्यूड सीनमुळे होतेय ट्रोल;

राधिका आपटेने 2016 मध्ये लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या चित्रपटात काम केलं होतं.

राधिका आपटेने 2016 मध्ये लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या चित्रपटात काम केलं होतं.

राधिका आपटेने 2016 मध्ये लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या चित्रपटात काम केलं होतं.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 13 ऑगस्ट- मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने(Radhika Apte) आत्तापर्यंत अनेक भूमिका साकारून चाहत्यांचं मन जिंकल आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाचं नेहमीचं कौतुक होतं असतं. मात्र सध्या राधिका आपटे जोरदार ट्रोल होतं आहे. ट्वीटरवर सध्या #BoyCottRadhikaApte हा ट्रेंड व्हायरल होतं आहे. पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरण राधिका आपटे ही एक उत्तम अभिनेत्री समजली जाते. तिने आपल्या खणखणीत अभिनयाने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठमोळ्या राधिकाने बॉलिवूड आणि साउथमध्ये आपली एक विशेष जागा निर्माण केली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर राधिकाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड व्हायरल होतं आहे. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये राधिकाने न्यूड सीन दिला होता. यावरूनचं तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे. राधिका आपटेने 2016 मध्ये लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये राधिका अभिनेता आदिल हुसैनसोबत झळकली होती. या चित्रपटात राधिकाने आदिलसोबत न्यूड सीन दिलं होतं. मध्यंतरी हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर लिक झाला होता. त्यामुळे राधिका आपटे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. त्यांनतर आज पुन्हा एकदा या सीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राधिकाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड ट्वीटरवर सुरु झाला आहे. (हे वाचा: Big News: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; आत्ता SIT टीम करणार तपासणी) बॉलिवूड चित्रपटांमुळे आपल्या देशामध्ये अश्लीलता पसरत आहे, म्हणत ट्रोलर्सनी राधिकाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राधिकाने भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. या सीनमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या