मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Big News: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; आत्ता SIT टीम करणार तपासणी

Big News: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; आत्ता SIT टीम करणार तपासणी

 पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 13 ऑगस्ट- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra Pornography Case) चांगलाच अडचणीत आला आहे. दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होतं चालली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणामध्ये आपल्याकडे राज कुंद्राविरुद्ध सबळ पुरावे असल्याचंदेखील म्हटलं आहे. हे प्रकरण सध्या खूपच गंभीर बनलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचने SIT टीम बनवली आहे.
View this post on Instagram

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

पोर्नोग्राफी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बनवलेल्या SIT टीमचा हेड एसपी लेव्हलचा अधिकारी असणार आहे. हा अधिकारीचं या टीमचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करणार आहे. ही टीम पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करणार आहे. त्यांनतर ही टीम मुंबई क्राईम ब्रांचला रिपोर्ट देणार आहे. मुंबई क्राईम ब्रांचने असा दावा केलं आहे की हे प्रकरण फक्त मुंबई किंवा देशापुरत मर्यादित नाही तर अगदी विदेशापर्यंत पसरलं आहे. (हे वाचा: PHOTOS: कित्येक वर्षानंतर या मराठी कलाकारांनी TVवर केलंय कमबॅक) यामध्ये मुंबई क्राईम ब्रांचने सर्वप्रथम राज कुंद्राच्या कंपनीचं विदेशात होणारं ट्रान्झक्शन तपासलं होत. तसेच कंपनीच्या सर्व्हरमधून डाटा डिलीट केल्याचंदेखील म्हटलं होतं. या पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्रासोबत तब्बल 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी समोर येत राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले आहेत. शर्लिन चोप्रा, पूनम पांडेसारख्या मॉडेल्सनी मुंबई पोलिसांकडे अनेक मोठमोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे.
First published:

Tags: Bollywood News, Raj kundra

पुढील बातम्या