Home /News /entertainment /

'शुभ्रा'चा संसार मोडण्यासाठी रचला जाणार मोठा कट, 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत नवा ट्विस्ट

'शुभ्रा'चा संसार मोडण्यासाठी रचला जाणार मोठा कट, 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत नवा ट्विस्ट

शुभ्राच्या संसारात आता वितुष्ट निर्माण करण्यासाठी सुजैन कोणकोणते प्रयत्न करणार हे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. ‘अग्गंबाई सूनबाई’ च्या नव्या प्रोमोची चांगलीच चर्चा होतं आहे.

  मुंबई, 24 एप्रिल : मराठी मालिकांनी (marathi serial) सध्या नवनवीन संकल्पना आणल्या आहेत. विविध धाटणीचे विषय हाताळले जात आहेत. ‘अग्गबाई सासूबाई’ (aggabai sasubai) नंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ (aggabai sunbai) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत लवकरच नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. शुभ्राचं (shubhra) अति पतिव्रता असणं सुजैनला (suzane) कसं खटकत आहे. हे सध्या दाखवण्यात येत आहे. सुजैनने शुभ्राचा संसार मोडण्याचा जणू चंगचं बांधला आहे. त्यामुळे ती शुभ्राच्या संसारात आता वितुष्ट निर्माण करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करणार हे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. ‘अग्गंबाई सूनबाई’ च्या नव्या प्रोमोची चांगलीच चर्चा होतं आहे. झी मराठी वाहिनीवर सध्या 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका प्रक्षेपित होते. मालिकेत शुभ्रा हे पात्र साधं-सरळ दाखवण्यात आलं आहे. ती आपल्या पतीवर खुपचं विश्वास ठेवते आणि प्रेम करते. तर पती म्हणजेच सोहम आपल्या ऑफिसच्या एका मुलीच्या प्रेमात आहे. ती मुलगी म्हणजेच सुजैन सतत शुभ्राला सोहमपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. साध्या-सरळ शुभ्राला या गोष्टी समजून येत नाहीत. त्याचबरोबर शुभ्राची सासू आसावरी आणि सासरे अभिजीत राजे हेसुद्धा सतत शुभ्राला तिच्या हक्कांची जाणीव करून देत असतात. असं काहीसं हे कथानक सुरू आहे.
  नवीन रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे, की शुभ्रा आपल्या नवऱ्यासाठी आणि सुखी संसारासाठी सोळा सोमवारांचं व्रत करणार असल्याचं सांगते. ही गोष्ट सुजैन ऐकते आणि ती मनाशी ठरवते की काही झालं तरी ती शुभ्राचा संसार मोडल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने मालिकेला नवीन वळण लागलं आहे. सुजैन शुभ्राच्या संसारात कोणकोणत्या अडचणी आणणार हे पाहण्यासठी चाहते उत्सुक झाले आहेत. (वाचा: 'तुला पाहते रे'च्या गोड ;ईशा'च्या मनमोहक अदा; गायत्रीचे PHOTO पाहून व्हाल फिदा) ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा सिक्वल आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये शुभ्राची सासू म्हणजेच आसावरी अत्यंत साधी आपल्या मुलाच्या प्रत्येक चुकीला त्याचा बालीशपणा समजून माफ करणारी दाखवण्यात आली होती. पण सिक्वलमध्ये अगदी उलट दाखवण्यात आलं आहे. यामध्ये शुभ्रा साधी सरळ गृहिणी, तर सासूबाई एका मोठ्या कंपनीची मालकीण दाखवण्यात आली आहे. पहिल्या भागात शेफ असणारे सासरे यामध्ये घर सांभाळताना दिसत आहेत. पहिल्या भागात अनेक उपद्व्याप केलेला सोहम म्हणजेच बबड्या आईसोबत कंपनीमध्ये काम करत आहे. असं हे कथानक आहे. (वाचा:पुरुषांचे आणि स्त्रियांचे कपडे वेगळे का?'; अभिजीत खांडकेकरच्या या पोस्टची होतेय) पहिल्या भागामध्ये सून शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती, तर सोहमची भूमिका आशुतोष पत्कीने साकारली होती. सासूच्या रुपात ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सासऱ्यांच्या भूमिकेत अभिनेते गिरीश ओक होते. मात्र या दुसऱ्या भागात तेजश्री आणि आशुतोषच्या जागी उमा पेंढरकर आणि अद्वैत दादरकरची भूमिका आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक दुसऱ्याही भागात कायम आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या