मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: आयुष्मान नव्हे तर हे होतं बॉलिवूड अभिनेत्याचं खरं नाव

HBD: आयुष्मान नव्हे तर हे होतं बॉलिवूड अभिनेत्याचं खरं नाव

आयुष्यमानने V चॅनेलवरील 'पॉपस्टार' या शोमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. त्यावेळी तो केवळ १७ वर्षांचा होता.

आयुष्यमानने V चॅनेलवरील 'पॉपस्टार' या शोमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. त्यावेळी तो केवळ १७ वर्षांचा होता.

आयुष्यमानने V चॅनेलवरील 'पॉपस्टार' या शोमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. त्यावेळी तो केवळ १७ वर्षांचा होता.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 सप्टेंबर-  'विकी डोनर'(Vicky Donor) या पहिल्याच चित्रपटातुन आपल्या अभिनयनाचा ठसा उमठवणारा अभिनेता म्हणजे आयुष्यमान खुराना(Ayushmnn Khurana) होय. हा अभिनेता आज आपला ३८ व वाढदिवस(38 Birthday Today) साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

आयुष्यमान खुराना हा एक अभिनेता तर आहेच. शिवाय तो एक उत्तम गायक आणि होस्टदेखील आहे. त्याने MTV वरील 'रोडीज' या शोमधून टेलिव्हिजनवर एन्ट्री केली होती. या शोच्या दुसऱ्या सिझनचा   तो विजेतादेखील आहे. तसेच त्याला २०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्याने सर्वांचा कौतूक मिळवलं होत.

१४ सप्टेंबर १९८४ मध्ये जन्मलेल्या अभिनेत्याचं खरं नाव आयुष्यमान नव्हे तर निशांत असं होतं. चंदिगढमध्ये एका पंजाबी कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याचं निशांत हे नाव बदलून आयुष्यमान असं ठेवलं होतं. तेव्हापासून तो आयुष्यमान खुराना झाला.

(हे वाचा:सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कशी आहे शेहनाजची अवस्था? अभिनव शुक्लाने दिली माहिती)

आयुष्यमानने V चॅनेलवरील 'पॉपस्टार' या शोमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. त्यावेळी तो केवळ १७ वर्षांचा होता. इतकंच नव्हे तर या शोमध्ये तो सर्वात कमी वयाच्या स्पर्धकांमधील एक होता.

(हे वाचा:HBD: रेल्वेत गाणं गाणारा कसा बनला विकी डोनर; वाचा आयुष्यमान खुरानाचा थक्क करणारा)

आयुष्यमानने बॉलिवूडमध्ये दम लगा के हायशा, अंधाधुन, बरेली कि बर्फी, बधाई हो, शुभमंगल सावधान, बाला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आयुष्यमानने बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आयुष्यमानला आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट पदार्पण फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्याला 'अंधाधुन' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

First published:

Tags: Ayushmann Khurrana, Entertainment