मुंबई, 10 फेब्रुवारी : या वर्षात आणखी एका अभिनेत्रीनं गूड न्यूज दिली आहे. अभिनेत्री अनिता हसनंदानी (anita hassanandani) आई झाली आहे. तिनं एका गोंडस मुलाला (anita hassanandani blessed with baby boy) जन्म दिला आहे. अनिता हसनंदानीचा नवरा रोहित रेड्डीनं आपल्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. मंगळवारी अनिताची डिलीव्हरी झाली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. दरम्यान डिलीव्हरीनंतर अनिताचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. अनिता हसनंदानी आई होताच तिची बेस्ट फ्रेंड आणि निर्माती एकता कपूर तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलमधून तिनं अनिताचा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ तिनं पोस्ट केला आहे.
व्हिडीओत अनिता एकदम उत्साहात दिसते आहे. आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतो आहे. आपली बेस्ट फ्रेंड आई झाला याचा आनंद एकतालाही तितकाच झाला आहे. जेव्हा तिला ही बातमी मिळाली तेव्हा तिनं अनिताच्या कुटुंबासह फोटो काढले, व्हिडीओतही ती नाचताना दिसली. हे वाचा - VIDEO: ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ गाण्यावर अंकितानं दिले एक्सप्रेशन, चाहते घायाळ 2013 मध्ये अनिता आणि रोहितने लग्न केले होते. लग्नाच्या 7 वर्षानंतर वयाच्या 39 व्या वर्षी अनिता आई बनली आहे.
‘ये है मोहब्बतें’ असो किंवा ‘नागीन’ अनिताचा अभिनय तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत आला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील चाहते नेहमी उत्सुक असतात. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अनिताने नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर शेअर केले आहे.