देशभरातील शेकडो तरुण-तरुणी दररोज बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत येतात. यापैकी काही जणांना यश मिळतं, परंतु काही जण अपयशी ठरतात. अपयशी झालेले काही कलाकार निराश होऊन आपल्या मायदेशी परततात. परंतु काही कलाकार मात्र वादग्रस्त विधानांद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. या फोटो गॅलरीत आपण असेच काही कलाकार पाहणार आहोत.
पूनम पांडे – पूनमनं नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपट फ्लॉप झाला. परंतु पूनम मात्र आपल्या वादग्रस्त विधानांमधून चर्चेत राहिली.
राखी सावंत – राखी गेली दोन दशकं बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. परंतु आजही तिला आपला जम बसवता आला नाही. त्यामुळं वादग्रस्त वक्तव्यामुळं ती चर्चेत असते.
शर्लिन चोप्रा – शर्लिनला बॉलिवूडमध्ये काही लहान-मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. परंतु तिचा एकही चित्रपट चालला नाही. परिणामी तिनं सेमी पॉर्न व्हिडीओंद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला.
सोफिया हयात – सोफिया एक सुपरमॉडेल म्हणून चर्चेत होती. परंतु हिंदी भाषा बोलता येत नसल्यामुळं तिला बॉलिवूडमध्ये फारशी संधी मिळाली नाही. सध्या ती देखील सेमी पॉर्न व्हिडीओंद्वारे चर्चेत असते.
पायल रोहतगी – पायलनं बोल्ड अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली परंतु एकही चित्रपट चालला नाही. सध्या ती ट्विटरवर राजकीय विधानं करुन चर्चेत असते. वादग्रस्त विधानांसाठी तिला अटकही करण्यात आली होती.
पायल घोष – प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करुन पायल प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टीत ती सामिल झाली होती. परंतु तिला तिथही यश मिळालं नाही.
कमाल खान – कमालनं अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये टिकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा एकही चित्रपट चालला नाही. सध्या तो बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत असतो.