मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्री Jacqueline Fernandez ला ईडीचा मोठा दणका; भारताबाहेर जाण्यावर बंदी कायम

अभिनेत्री Jacqueline Fernandez ला ईडीचा मोठा दणका; भारताबाहेर जाण्यावर बंदी कायम

 बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस   (Jacqueline Fernandez)   सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar)  200 कोटी वसूली प्रकरणी   (Money Laundering)  अडचणीत येत आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी वसूली प्रकरणी (Money Laundering) अडचणीत येत आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी वसूली प्रकरणी (Money Laundering) अडचणीत येत आहे.

  • Published by:  Aiman Desai

 मुंबई, 23 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस   (Jacqueline Fernandez)   सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar)  200 कोटी वसूली प्रकरणी   (Money Laundering)  अडचणीत येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या या प्रकरणात जॅकलिनच्या सुकेशशी असलेल्या संबंधांची ईडी  (ED)  चौकशी करत असताना, अभिनेत्रीसाठी हे प्रकरण गंभीर बनत चाललं आहे. नुकतीच जॅकलिन कामानिमित्त परदेशात गेली होती. त्यानंतर तिला एयरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्रीविरोधात लुकआउट नोटीस जारी केलं होतं. त्यामुळे तिला परदेशात जाण्यावर बंदी आहे. जॅकलिनने ईडीला ही नोटीस मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावर ईडीने अभिनेत्रीला मोठा दणका दिला आहे.

जॅकलिन फर्नांडिसचा अर्ज ईडीने फेटाळला-

जॅकलीन फर्नांडिसने तिच्याविरोधात जारी केलेली लुकआउट नोटीस काढून टाकण्यात यावी, अशी विनंती केली होती. जेणेकरून ती भारताबाहेर फिरू शकेल. मात्र अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिची विनंती मान्य करण्यास नकार दिला आहे. हे लूकआउट नोटीस मागे घेण्यास ईडी अजिबात तयार नाही. हा अर्ज रद्द केल्यामुळे आता जॅकलिन भारतातून परदेशात जाऊ शकणार नाही.

त्यामुळे जॅकलिनने ईडीकडे केली होती विनंती-

प्रोफेशनल कमिटमेंटसाठी जॅकलिननं ईडीकडे ही विनंती केल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, तिनं आधीच काही कामांसाठी कमिटमेंट दिली आहे. त्यामुळे तिला परदेशात जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ती ईडीकडे लुकआउट नोटीस रद्द करण्याची विनंती करत होती. सध्यातरी जॅकलिनला ईडीकडून क्लीन चिट मिळालेली नाही.

(हे वाचा:जॅकलिनच्या सुपरहिरो चित्रपटासाठी 500 कोटींची गुंतवणूक करणार होता सुकेश चंद्रशेखर)

मनी लॉन्ड्रिंग-

हे सर्व प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुकेशचं जॅकलिनसोबतचं कनेक्शन समोर आलं आहे. सुकेशनं म्हटलं आहे की, त्यानं अभिनेत्रीला अनेक आलिशान भेटवस्तू दिल्या आहेत. त्यानंतर सुकेश आणि जॅकलीनचे काही फोटोही सोशल मीडियावर लीक झाले होते. ज्यामध्ये जॅकलिन आणि सुकेश किस करताना आणि सेल्फी घेताना दिसून आले होते.

(हे वाचा: नोरा फतेहीच्या कारने दिली धडक; संतप्त जमावाने ड्रॉयव्हरची केली अशी अवस्था)

जॅकलिनला मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू-

सुकेशनं जॅकलिनला 10 कोटी रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या मांजराचा समावेश आहे. सुकेशनं नोरालाही भेटवस्तूही दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. सुकेशनं नोराला आयफोन आणि बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. आता ईडीची या दोन्ही अभिनेत्रींवर नजर आहे.

First published:

Tags: ED, Entertainment, Jacqueline fernandez