मुंबई, 21 डिसेंबर - बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) महाठग सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) प्रकरणामुळे बरीच चर्चेत आहे. भेटवस्तू देण्यासोबतच सुकेशनं जॅकलिनच्या अनेक चित्रपटांची निर्मिती करण्याचं आश्वासनही दिलं होतं. सुकेशनं जॅकलीनला सांगितलं होतं की, तो 500 कोटी रुपयांचा तीन भागांचा वुमेन सुपरहिरो चित्रपट तयार करेल ज्यामध्ये जॅकलीन मुख्य भूमिकेत असेल.
इंडिया टुडेच्या ताज्या वृत्तानुसार, एका सूत्राचं म्हणणं आहे की सुकेशला हे चांगलंच ठाऊक होतं की, जॅकलिन बॉलिवूडमध्ये काम शोधत आहे. ती जास्त चित्रपट साइन करणार नव्हती. आणि सुकेशनं जॅकलिनला जास्त आकर्षित करण्यासाठी सापळा रचला होता. अशाच एका संभाषणात सुकेशनं जॅकलीनला वचन दिलं की तो तिच्यासोबत भारतातील पहिल्या वुमेन सुपरहिरो चित्रपटाची सह-निर्मिती करेल ज्यामध्ये हॉलीवूडचे VFX कलाकार असतील.
मीडिया रिपोर्टनुसार, “हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रित केला जाईल. त्यानं जॅकलीनला सांगितलं होतं की ती हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखीच आहे. ती सुपरहिरो चित्रपटात मुख्य भूमिकेला पात्र आहे. सूत्रानं सांगितलं की, जॅकलीनचं सुकेशशी याबद्दल फारच कमी बोलणं झालं होतं. पण तिला याबद्दल काही अंशी खात्री पटली होती. सुकेशला फिल्म इंडस्ट्रीचं खूप चांगलं ज्ञान होतं. आणि त्याला फिल्मचं बजेट, प्रोडक्शन या सगळ्याची माहिती होती. सुकेशनं जॅकलिनचं मन वळवण्यासाठी इंडस्ट्रीशी संबंधित मोठ्या लोकांची नावेही सांगितली होती.
(हे वाचा: महाठग सुकेशला Kiss करताना दिसली जॅकलिन; VIRAL फोटो पाहून चाहते ...)
दरम्यान, ठग सुकेशच्या चौकशीदरम्यान ईडीने जॅकलिनवर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या गेराल्डिन या जॅकलीन फर्नांडिसच्या बहिणीला त्यानं पैसे ट्रान्सफर केल्याचं म्हटलं आहे. परंतु जॅकलीननं ईडीला तिच्या सबमिशनमध्ये याबाबतची सत्यता सांगितलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.