मुंबई, 30 मार्च : ड्रग्ज पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर (NCB Arrests Drug Supplier Shadab Batata) आता बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) अडचणीत सापडला आहे. अभिनेता एजाज खानला (Eijaz Khan) ताब्यात घेण्यात आलं आहे. एजाज खानला मुंबई विमानतळावरच ताब्यात (NCB detained bollywood actor Eijaz Khan) घेण्यात आलं. एनसीबीने ही कारवाई केली आहे. शादाबच्या अटकेनंतर काही दिवसांतच एनसीबीने ही कारवाई केली.
25 मार्चला रात्री ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या शादाब बटाटाला एनसीबीने अटक केली. शादाब हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा फारुख बटाटा (Drug Supplier Farukh Batata) याचा मुलगा. त्याच्या अटकेनंतर अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. तो बटाटा गँगचा भाग असल्याचं सांगितलं जातं आहे. एजाज आज राजस्थानहून मुंबईत पोहोचला. तो मुंबई विमानतळावर पोहोचताच एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. याशिवाय अंधेरी ते लोखंडवाला अनेक ठिकाणी एनसीबीने छापे टाकले आहेत.
हे वाचा - संगीत क्षेत्राला धक्का! प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू; वेगाने घेतला जीव
शादाब बटाटा मागील बऱ्याच काळापासून ड्रग्ज पुरवठा करण्याचं काम करतो. मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनाही तो ड्रग्ज पुरवठा करायचा. मुंबईमध्ये एमडीएमएशिवाय विदेशातून येणाऱ्या एलएसजी, गांजा, कोकीन यासारख्या ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा फारुख बटाटावाला करतो. हाय प्रोफाईल लोकांमध्ये त्याची चांगली ओळख आहे. मुंबईतील प्रत्येक बार आणि मोठ्या ड्रग्ज पार्टीमध्ये तोच ड्रग्ज पुरवतो. मुंबईतील ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यातलं सर्वात मोठं नावं फारुख शेख उर्फ फारुख बटाटा आहे. फारुख सुरुवातील बटाट्याची विक्री करायचा. याचवेळी तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि आज तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार आहे. आता ड्रग्जच्या दुनियेचं संपूर्ण काम त्याची दोन मुलं सांभाळतात.
हे वाचा - 'काही पप्पा बनून फिरण्याऱ्यांच्या शोमध्ये..'नाव न घेता कंगनाचे करण जौहरला खडेबोल
शादाबचा तपास एनसीबी गेल्या अनेक दिवसांपासून करत होती. मात्र, गुरुवारी रात्री करण्यात आलेल्या छापेमारीत एनसीबीला मोठं यश मिळालं आहे. एनसीबीने ज्या दिवशी शादाबला अटक केली त्या रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. यात मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज जप्त करण्यात आले, याची बाजारातील किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय एनसीबीनं महागड्या गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. त्याच्याकडून पैसे मोजण्याची मशीनही जप्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.