जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ला मिळणार जामीन? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी

ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ला मिळणार जामीन? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी

ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ला मिळणार जामीन? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी

Aryan Khan Bail News: ड्रग प्रकरणात गेल्या 3 आठवड्यांपासून जेलमध्ये बंद असणाऱ्या शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला आज जामीन मिळणार की नाही, यावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑक्टोबर: मुंबईतील क्रूझवरी अंमली पदार्थ जप्त केल्याच्या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan Son Aryan Khan Arrested) आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या जामीन याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी (Aryan Khan Bail News) होणार आहे. गेल्या सुनावणीत आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायाधीश एन डब्लू सांब्रे यांच्या सिंगल बेंचसमोर याचिका दाखल केली होती आणि त्यावर तत्काळ सुनावणी केली जावी अशी मागणी केली होती. दरम्यान NCB कडून बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी एका आठवड्याचा कालावधी मागितला होता. यानंतर सांब्रे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 26 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. दरम्यान आर्यन खानच नव्हे तर आज कोर्टात फॅशन मॉडेल मुनमुन धमेचा हिच्या जामीन याचिकेवर देखील सुनावणी होईल. मुंबई स्थित विशेष न्यायालयाने बुधवारी 19 ऑक्टोबर रोजी आर्यन खानची जामीन याचिका फेटाळली होती. कोर्टाने त्यावेळी असे म्हटले या प्रकरणात पाहता आर्यन खान अंमली पदार्थांसंबधित व्यवहारात सहभागी होता. व्हॉट्सअॅप चॅटवरून (Aryan Khab WhatsApp Chat) देखील असच वाटत आहे की तो अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होता. कोर्टाने अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन याचिका देखील फेटाळल्या आहेत. हे वाचा- पतीवर होणाऱ्या गंभीर आरोपानंतर अभिनेत्री क्रांती रेडेकरचं Tweet व्हायरल एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईहून (NCB Raid Mumbai) गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये अंमली पदार्थ जप्त करण्यासाठी धाड टाकली होती. यावेळी या तिघांना अटक (NCB Arrested Aryan Khan) करण्यात आली होती. तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन खान आणि मर्चंट आर्थर रोड जेलमध्ये आहेत तर  धमेचा भायखळा जेलमध्ये बंद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात