मुंबई, 25 ऑक्टोबर : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan Khan drug case) अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे (kranti redkar )पती आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर (sameer wankhede wife kranti redkar)चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतंच क्रांतीने या संपूर्ण प्रकरणावर एक ट्वीट करत . “सत्यमेव जयते,” असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर क्रांतीचे हे ट्वीट चर्चेत आहे.
क्रांती रेडेकरने ट्वीट करत म्हटले आहे की, “जेव्हा तुम्ही प्रवाहाविरोधात पोहता, तेव्हा तुम्हाला लाटांची चिंता नसते. पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्याला माहिती आहे. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असे ट्वीट क्रांतीने केले आहे. सोशल मीडियावर हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे.
When you swim against the tide , it may drown you, but if the almighty is with you , no tide this is world is big enough to drown you. Because , only HE 👆🏻knows the truth 🙏🙏🙏 good morning . SATYAMEV JAYATE.
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) October 25, 2021
मुंबईतली क्रूझ ड्रग्स पार्टीवर केलेल्या कारवाईसंदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी केलेल्या आरोपानंतर काल या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साहिल नवा गौप्यस्फोट केला. आर्यन खानच्या (aryan Khan drug case) सुटकेसाठी शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचा दावा प्रभाकर साहिलनं केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर क्रांती रेडकरने ट्वीट केले आहे. क्रांतीच्या या ट्वीटवर नेटकऱ्याने मात्र कमेंटचा वर्षाव करत अनेक प्रश्न विचारले आहेत.
वाचा : चित्रमहर्षींच्या नावाचा मान मिळाला थलायवा रजनीकांतला; कंगनासह कुणाला मिळाला मान
प्रभाकर साहिलने काय केले आहेत आरोप
प्रभाकर साहिल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sharukh khan