'त्यांना याची किंमत मोजावी लागेल'; आत्महत्येच्या बातमीमुळं संतापला अध्ययन सुमन

'त्यांना याची किंमत मोजावी लागेल'; आत्महत्येच्या बातमीमुळं संतापला अध्ययन सुमन

शेखर सुमन यांच्या मुलानं आत्महत्या केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या बातमीवर अभिनेता संतापला. म्हणाला...

  • Share this:

मुंबई 23 फेब्रुवारी : लॉकडाउनच्या काळात आत्महत्येंचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही काळात अनेक तरुणांनी, मजुरांनी आणि काही सेलिब्रिटींनी देखील बेरोजगार झाल्यामुळं आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. याच दरम्यान अभिनेता अध्ययन सुमन यानं देखील आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चर्चेत होती. बॉलिवूडमधून चित्रपटांच्या ऑफर मिळत नसल्यामुळं त्यानं आत्महत्या केली अशा बातम्या काही वृत्तमाध्यमांनी पसरवल्या होत्या. मात्र या केवळ अफवा आहेत. कोणीही यावर विश्वास ठेवू नये. अशी विनंती स्वत: अध्ययनने आपल्या चाहत्यांना केली आहे.

अध्ययन हा प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आहे. गेल्या काही काळापासून तो सिनेसृष्टीपासून दूर आहे. कंगना रणौतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही काळ तो नैराश्येत देखील होता. परिणामी त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला अशा बातम्या काही वृत्तमाध्यमांनी पसरवल्या होत्या. त्यामुळे अध्ययनचे चाहते सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली देत होते. काही जणांनी तर शेखर सुमन यांना फोन करुन आपलं दु:ख व्यक्त केलं. अखेर पसरलेल्या या अफवा रोखण्यासाठी स्वत: अध्ययन समोर आला. त्यानं एका इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे आपण जिवंत आहोत काळजी नसावी हा संदेश चाहत्यांना दिला.

View this post on Instagram

A post shared by TINKA SINGH (@adhyayansuman)

गडा इलेक्ट्रॉनिक्सला लागणार टाळं?; जेठालाल सोडतोय गोकूळधाम सोसायटी

तो म्हणाला, “मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. काही जणांनी माझ्या आत्महत्येची बातमी व्हायरल केली. ही बातमी पाहून मला धक्काच बसला. मला अनेकांचे फोन आणि मेसेज आले. सर्व जणांना माझी काळजी वाटू लागली. परंतु कोणीही काळजी करु नये. मी जिवंत आहे. मी आत्महत्या केलेली नाही. ज्या वृत्तमाध्यमानं माझ्या आत्महत्येची बातमी पसरवली त्यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 23, 2021, 4:36 PM IST

ताज्या बातम्या