मुंबई 4 जुलै: भारतात सेक्क्स, गुप्त रोग अशा अनेक विषयांबद्दल आजही मौन बाळगलं जातं. किंवा अनेकदा या गोष्टींना गरज किंवा समस्या म्हणून पाहिलं जात नाही. गुप्तांगांच्या रोगाला वेडेपणा असं नाव देऊन त्याला सुद्धा योग्य उपचारांची गरज आहे याबद्दल काहीसा संकोचाचा सूर दिसतो. पण आता गुप्त रोगाला गुप्त ठेवायची गरज नाही. कारण सोनी लिव्हवरून (Sony Liv new web show) असाच विषयवार भाष्य करणारी एक नवीकोरी सिरीज भेटीला येत आहे ज्याचं नाव (Dr. Aroda new webseries) आहे ‘डॉ. अरोडा’. गुप्त रोग असं नाव असणाऱ्या या रोगालाच इतकं गुप्त ठेवलं जातं की अशा रोगांबद्दल आजही अनेक ठिकाणी शरम आणि संकोचाची भावना अधिक आहे. पण अशा रोगांना ठीक करणाऱ्या एका डॉक्टरची कहाणी घेऊन ही नवीकोरी सिरीज भेटीला येणार आहे. यामध्ये कुमुद मिश्रा (Kumud Mishra) हा गुणी कलाकार डॉ. अरोडा हे पात्र साकारताना दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) या सीरिजचे मेकर आहेत. या सिरींजचा ट्रेलर आज प्रसिद्ध झाला असून त्याला फारच पसंत केलं जात आहे.
गुप्त रोगासारख्या महत्त्वाच्या विषयाला अगदी अलगद आणि विनोदी ढंगात हात घालणारं हे कथानक फारच प्रभावी असणार याची जाणीव ट्रेलरवरून होत आहे. इतका नाजूक विषय असला तरी कुठेही सीमा न ओलांडता अचूक मर्म ओळखून त्यावर भाष्य करणारा हा ट्रेलर नक्कीच सिरीजबद्दल उत्सुकता वाढवत आहे. हे ही वाचा- Madhubala Biopic: अभिनेत्री मधुबालाच्या बायोपिकची घोषणा, पण नाही दाखवणार किशोर कुमारबरोबरचं नातं? सध्या She वेबसिरीजमुळे इम्तियाज अली यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जात आहे. त्यांचा नेहमीच जॉनर सोडून असणारी ही वेबसिरीज बरीच यशस्वी झाल्याने त्यांचे वेगवेगळ्या विषयातले प्रयोग उत्तम पद्धतीने स्वीकारले जात आहेत.त्यामुळे या प्रोजेक्ट कडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. कुमुद मिश्रा यांच्यासारखा अप्रतिम अभिनेता या पात्राला चांगला न्याय देत आहे असं ट्रेलरवरून समजत आहे. सध्याच्या घडीला असा एक विषय घेऊन त्याला असणारे गैरसमज दूर करणं, त्याबद्दल चंद्राचा सुरु करायची पहल करणं हेच कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहे.