Home /News /entertainment /

Madhubala Biopic: अभिनेत्री मधुबालाच्या बायोपिकची घोषणा, पण नाही दाखवणार किशोर कुमारबरोबरचं नातं?

Madhubala Biopic: अभिनेत्री मधुबालाच्या बायोपिकची घोषणा, पण नाही दाखवणार किशोर कुमारबरोबरचं नातं?

मुघल-ए-आझम, चलती का नाम गाडी, हाफ तिकीट अशा अनेक चित्रपटांत झळकलेल्या या अभिनेत्रीने 1969 साली वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मधुबाला यांच्या जिवनावर आधारीत सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई, 04 जुलै: मधुबाला (Madhubala) म्हणजे एक काळ गाजवणारी सौंदर्याची सम्राज्ञी. भावणारा अभिनय आणि नजाकतदार सौंदर्य यांनी तिने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. मुघल-ए-आझम (1960), चलती का नाम गाडी (1958), हाफ तिकीट (1962) अशा अनेक चित्रपटांत झळकलेल्या या अभिनेत्रीने 1969 साली वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून तिच्यावरच्या चरित्रपटाचं अर्थात बायोपिकचं काम सुरू आहे. बायोपिक म्हटलं, की आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आल्याच; पण मधुबालाच्या किशोर कुमार किंवा दिलीप कुमारबरोबर असलेल्या रिलेशनशिप्सचा समावेश या बायोपिकमध्ये (Biopic on Madhubala) कदाचित नसण्याची शक्यता आहे. मधुबालाच्या भगिनी मधुर भूषण यांनी 'ई-टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मधुबाला दिलीप कुमारशी (Dilip Kumar) अनेक वर्षं रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांची कोर्ट केस झाल्यानंतर त्या रिलेशनशिपबद्दल सर्वांना कळलं. 1960 साली मधुबाला आणि प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा विवाह झाला. 1969 साली तिचं निधन झालं. किशोर कुमार (Kishor Kumar) यांनी मधुबालाकडे तिच्या अखेरच्या दिवसांत दुर्लक्ष केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. हेही वाचा - Big Bossसाठी मालिका सोडली, पण आता पश्चाताप....; आदिशनं केला खुलासा मधुर भूषण यांनी सांगितलं, 'मधुबालाची गोष्ट सांगताना आम्ही कोणालाही दुखवू इच्छित नाही. किशोर कुमार आणि दिलीप कुमार यांच्या बाबतीत काय झालं, या विषयात आम्ही पडणार नाही. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये चढ-उतार असतात; पण ज्याप्रमाणे आमच्या वडिलांबद्दलच्या भूतकाळातल्या अप्रिय गोष्टी कोणी सांगितल्यास आम्हाला आवडणार नाही, त्याचप्रमाणे त्यांच्याही बाबतीत होईल. आम्ही केवळ मधुबालाचं लाइफ सेलिब्रेट करू इच्छितो, ते करताना कोणाच्याही भावना दुखावू इच्छित नाही.' मधुबाला-दिलीप कुमार हे 50च्या दशकातल्या सर्वांत लोकप्रिय ऑनस्क्रीन कपल्सपैकी एक होतं. (Mughal-E-Azham) 'मुघल-ए-आझम'मधल्या सलीम-अनारकलीच्या ऐतिहासिक भूमिका तर त्यांनी साकारल्याच. शिवाय, तराणा, अमर, संगदिल अशा अन्य अनेक चित्रपटांतही हे कपल लोकप्रिय ठरलं. हेही वाचा - Shahrukh and Salman reunite: किंग खान आणि भाईजान अखेर 20 वर्षांनी येणार एकत्र? चर्चांना उधाण मधुबाला आणि किशोरकुमारचा विवाह हा बी-टाउनमधला कायम चर्चिला जाणारा विषय आहे. मधुबाला आजारी पडली आणि त्यांच्या नात्यांतला चार्म हरवला, असं बोललं जातं. मधुर भूषण यांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या एका वेगळ्या बाजूवर प्रकाश टाकला. मधुबालाच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदान अचानक झाल्यामुळे किशोर कुमारना खूपच दुःख झालं होतं, असं मधुर भूषण यांनी सांगितलं. 'ते तिचे पती होते. साहजिकच तिच्याबद्दल झालेल्या या निदानामुळे त्यांच्यावर खूप परिणाम झाला. जेव्हा ते तिला तपासणीसाठी लंडनला घेऊन गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आस्पी गोलवाला होते. मधुबालाकडे आता केवळ दोनच वर्षांचं आयुष्य आहे हे जेव्हा कळलं, तेव्हा किशोरभैयांना खूप वाईट वाटलं, त्यांच्यावर मोठा परिणाम झाला,' असं मधुर भूषण यांनी सांगितलं.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

पुढील बातम्या