मुंबई, 17 जुलै : मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये अनेक वर्ष मालिका आणि सिनेमांचं शुटींग सुरू आहे. अनेक प्रोजेक्ट्सचे सेट या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचं अनेकदा दिसलं आहे. काही दिवसांआधी बालकलाकार मायरा वायुकळ हिच्या मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर आता फिल्मसिटीतील आणखी एका मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बिबट्यानं थेट कुत्र्यावर हल्ला केला असून कुत्र्याचा जागीत मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी तसेच हिंदी सिनेमा किंवा मालिकांचं शुटींग जिथे होतं ते म्हणजे गोरेगावच्या दादसाहेब फाळके चित्रनगरीमध्ये. ही चित्रनगरी गोरेगाव फिल्मसिटी म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष अनेक मालिका आणि सिनेमांचे मोठे सेट या भागात लावण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे हजारो कलाकृतींचं शुटींग या ठिकाणी सुरू असतं. दरम्यान या भागात वन्यप्राण्यांचा वावर पाहायला मिळतोय. गोरेगाव बोरिवली भागात राहणाऱ्या लोकांना बिबट्यांचा वावर काही नवा नाही. हेही वाचा - शो मस्ट गो ऑन… मालिकेच्या शुटिंग दरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याची प्रकृती खालावली; सेटवरचं बोलवावा लागला डॉक्टर
Leopard enters the serial set at Film City,mumbai Shooting for the serial Ajooni was underway at Film City in the morning, when a leopard entered the set and attacked the dog.More than 200 people were present on the set #Leopard #filmcity #mumbai pic.twitter.com/yyDJsolcfK
— Preeti Sompura (@sompura_preeti) July 17, 2023
स्टार प्लसवर अजूनी ही प्रसिद्ध हिंदी मालिका सुरू आहे. या मालिकेचं शुटींग गोरेगाव फिल्मसिटीत सुरू आहे. याच मालिकेच्या सेटवर शुटींग सुरू असताना अचानक बिबट्या घुसला. मालिकेचा सगळा क्रू घाबरला. 17 जुलैच्या सकाळी हा बिबट्या सेटवर घुसला. सेटवर असलेल्या कुत्र्यावर त्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यानं कुत्र्याचा कोथळा बाहेर काढला. कुत्र्याचा जागीत मृत्यू झाला.
अजूनी मालिकेच्या सेटच्या वरच्या भागातून तो चालत असताना त्याचा व्हिडीओ शुट करण्यात आला. सेटवर बिबट्या घुसला त्यावेळस तिथे जवळपास 200 लोक उपस्थित होते. ज्यात कलाकार, प्रोडक्शन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, बॅकस्टेज इ लोकांचा समावेश होता. पण सुदैवाने सेटवरील कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. कुत्र्यामुळे 200 लोकांचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. घटनेनंतर मालिकेच्या सेटवर भितीचं वातावरण आहे.