मुंबई, 11 नोव्हेंबर- डॉक्टर डॉन फेम देवदत्त नागे (devdatta nage) एका मोठा हिंदी प्रोजेक्ट मिळाला आहे. देवदत्त नागे आदिपुरुष’ (adipurushs) या महत्त्वाकांक्षी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक ओम राऊतने या सिनेमाचं चित्रीकरण संपल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. दिग्दर्शक ओम राऊतने सोशल मीडियावर या सिनेमातील स्टारकास्टसोबत काही फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.या सिनेमाचं शुटिंग नुकतंच संपलं आहे. 103 दिवसांनंतर या सिनेमाचं शुटिंग संपलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘हे आदिपुरुषचं शुटिंग रॅप आहे. एक रोमांचक प्रवास त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आला आहे. ही जादु तुमच्याशी शेअर करण्याची उत्सुकता आहे. देवदत्त नागेसोबतच या सिनेमात तृप्ती तोरडमल आणि अभिनय बेर्डे हे मराठी कलाकार झळकणार असल्याचंही समजत आहे. वाचा : VIDEO : स्वीटूच्या ऑफ स्क्रिन मस्तीपेक्षा नेटकऱ्यांना नलू मावशीचं कौतुक फार तानाजीनंतर देवदत्त नागे‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिपुरुषमध्ये भली मोठी स्टारकास्ट काम करताना दिसते आहे. प्रभास , सैफ अली खान, क्रिती सेनन, देवदत्त नागे आदि कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ओम राऊत देखील यात दिसणार आहे.
झी मराठीवरील ‘जय मल्हार’ मालिकेतून प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवलेला अभिनेता देवदत्त नागेने ‘तान्हाजी’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांचेही मनोरंजन केले.तान्हाजी मालुसरे यांचे बंधु सूर्याजी मालुसरे यांची भूमिका देवदत्तने साकारली होती.आता तो पुन्हा तो एका नव्या भूमिकेत आपल्याला आदिपुरूष या सिनेमातून भेटीला येणार आहे. देवदत्तचा हा तिसरा बॉलिवूड चित्रपट आहे. यापूर्वी त्याने‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. देवदत्तला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातील स्टारकास्टमुळे चित्रपट चर्चेत आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी देखील प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत.