Home /News /entertainment /

VIDEO : स्वीटूच्या ऑफ स्क्रिन मस्तीपेक्षा नेटकऱ्यांना नलू मावशीचं कौतुक जास्त

VIDEO : स्वीटूच्या ऑफ स्क्रिन मस्तीपेक्षा नेटकऱ्यांना नलू मावशीचं कौतुक जास्त

स्वीटू आणि नलू मावशीचा पडद्यामागचा धमाल मस्तीचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही धमाल पाहून नेटकऱ्यांनी स्वीटूचं सोडून नलू मावशीचे कौतुक केले आहे.

  मुंबई, 11 नोव्हेंबर-झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते . या मालिकेती नलू मावशी आणि स्वीटू ही मायलेकीची जोडी देखील प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सध्या मालिका एका वळणावर आहे. अशातच स्वीटू आणि नलू मावशीचा पडद्यामागचा धमाल मस्तीचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही धमाल पाहून नेटकऱ्यांनी स्वीटूचं सोडून नलू मावशीचे कौतुक  केले आहे. झी मराठीच्या इन्स्टा पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एका महत्त्वाचा सीन शूट करण्यात येत आहे. यामध्ये स्वीटू नलू मावशीला सांगताना दिसत आहे की, माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय तू कशी काय घेऊ शकतेस. हा सीन मालिकेत नवीन ट्वीस्ट घेऊन येणार आहे. मात्र स्वीटू हा सीन शूट करताना मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. नलू मावशी स्वीटूला मोहितसोबतच्या नात्यातून मुक्त होण्यास सांगत आहे. हा महत्त्वाचा सीन कसा शूट करण्यात आला व यामाचे स्वीटूची मस्ती देखील कॅमेरात कैद करण्यात आली आहे.
  स्वीटू मस्तीपेक्षा चाहत्यांनी मात्र मालिकेतील या नव्या ट्वीस्टवरून पुन्हा एकदा मालिकेला ट्रोल केलं आहे. एकाने म्हटलं आहे की, नलू सांगतेय म्हणजे आता, स्वीटू पुन्हा जुन्या कपड्यात दिसणार आणि ओमसोबत लग्न होणार नाही. तर एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, म्हणजे आता हम दिल दे चुके होणार..एकानं म्हटल आहे की, नलू सांगतेय तर आता स्वीटूला परत मोहितसोबत राहायचे आहे का.. तर दुसऱ्याने म्हटलं आहे कधी आहे भाग..तर एकाने म्हटलं आहे, नलू मावशी आपल्या मुलीसाठी स्टॅण्ड घेतेय म्हटल्यावर काही तरी चांगलं पाहण्यास मिळणार...हा सीन पाहून सर्वांनी नलू मावशीच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. वाचा : तुम्ही पाहिलाय का सुपरस्टार Rajinikanth यांचं घर? Inside Photo आले समोर यापूर्वी स्वीटूचं मोहितसोबत लग्न झालं तेव्हा नेटकऱ्यांनी नलू मावशीवर निशाणा साधला होता. आता मात्र नलू मावशीचा हा निर्णय पाहून नेटकरी नलू मावशीचं कौतुक करत आहे. खरंच आता स्वीटू नलू मावशीचं ऐकून मोहितसोबतचं नात तोडून ओमचा हात धरणार का..हे येणाऱ्या भागात समजणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या