मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Singer KK Car collection: आलिशान कारचा शौकीन होता KK, गायकाच्या महागड्या कारचं कलेक्शन; नुकतीच घेतली होती 'ही' महागडी कार

Singer KK Car collection: आलिशान कारचा शौकीन होता KK, गायकाच्या महागड्या कारचं कलेक्शन; नुकतीच घेतली होती 'ही' महागडी कार

Singer KK Car collection: केके त्याच्या लग्झरी लाइफसाठीही ओळखले जात होते. त्यांना गाड्यांची खूप आवड होती.

Singer KK Car collection: केके त्याच्या लग्झरी लाइफसाठीही ओळखले जात होते. त्यांना गाड्यांची खूप आवड होती.

Singer KK Car collection: केके त्याच्या लग्झरी लाइफसाठीही ओळखले जात होते. त्यांना गाड्यांची खूप आवड होती.

    नवी दिल्ली, 01 जून: प्रसिद्ध गायक (Famous singer Krishnakumar Kunnath) कृष्णकुमार कुननाथ (KK) यांचे कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान निधन (passed away) झाले. स्टेजवरच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर 10.30 च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. केकेनं हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके त्याच्या लग्झरी लाइफसाठीही ओळखले जात होते. त्यांना गाड्यांची खूप आवड होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे जीप चेरोकी, मर्सिडीज बेंज ए क्लास आणि ऑडी आरएस 5 होती. ऑडी RS5 सिंगरने या वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी केली होती. दिवंगत गायक त्यांच्या गाण्यांच्या अष्टपैलू निवडीमुळे लोकप्रिय होते आणि त्यांचे जवळजवळ प्रत्येक गाणे ब्लॉकबस्टर ठरले यात आश्चर्य नाही. लक्झरी गाड्यांचा शौकीन, KK सध्या ऑडी RS5 चालवत होते आणि ती त्याची आवडीचीही होती. जगात Monkeypox च्या वाढत्या धोक्यानंतर भारत सरकारचा Alert मोड ऑन  गायकाने त्यांच्या नवीन ऑडी RS5 स्पोर्टबॅकची स्मॅशिंग मेटॅलिक टँगो रेड पेंट स्कीममध्ये जानेवारीमध्ये डिलिव्हरी घेतली, ज्याचा फोटो त्यांनी त्यांच्या Instagram वर शेअर केला होता. फोटोत नवीन कारची डिलिव्हरी घेताना केके त्यांच्या पत्नी ज्योतीसोबत होता. Audi RS5- (1.04 कोटी रुपये, एक्स-शोरूम) Audi RS5 फक्त 3.9 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवते आणि 250 किमी/ताशी इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या मर्यादित टॉप स्पीड आहे. सेगमेंटमध्ये, ती BMW M3, Lexus RC F सारख्या कारशी स्पर्धा करते. Audi RS5 ची किंमत 1.04 कोटी रुपये, एक्स-शोरूम आहे. Jeep cherokee - 75 लाख (एक्स-शोरूम) ग्रँड जीप चेरोकी देखील दिवंगत सिंगरच्या गॅरेजचा एक भाग होता, ज्यासोबत सिंगर अनेकदा दिसले होते. Jeep cherokee 6 रंगांच्या पर्यायांमध्ये येते, ज्यामध्ये डीप चेरी रेड क्रिस्टल पर्ल, ब्रिलियंट ब्लॅक क्रिस्टल पर्ल, ब्राइट व्हाइट, ट्रू ब्लू पर्ल, ग्रॅनाइट क्रिस्टल आणि बिलेट सिल्व्हर यांचा समावेश आहे. Mercedes BenZ A Class ( 32.32 लाख) दिवंगत गायक केकेच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes BenZ A Class ही समावेश होता. मात्र या आलिशान कारची निर्मिती कंपनीने 2019 मध्येच बंद केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Car

    पुढील बातम्या