जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Diwali 2022: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नयनताराने दाखवली आपल्या जुळ्या मुलांची झलक; सुपरक्युट VIDEO VIRAL

Diwali 2022: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नयनताराने दाखवली आपल्या जुळ्या मुलांची झलक; सुपरक्युट VIDEO VIRAL

नयनतारा

नयनतारा

साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून अभिनेत्री नयनताराला ओळखलं जातं. नयनतारा साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात नयनताराचा मोठा चाहतावर्ग आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर-  साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून अभिनेत्री नयनताराला ओळखलं जातं. नयनतारा साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात नयनताराचा मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच नयनतारा दिग्दर्शक-निर्माता विघ्नेश शिवणसोबत लग्नबंधनात अडकली आहे. इतकंच नव्हे तर लग्नाच्या काही महिन्यांतच अभिनेत्री सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांची आई बनली आहे. आता नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. या दोघांसाठी ही दिवाळी खूप खास ठरली आहे. कारण हे जोडपं नुकतंच आईबाबा बनले आहेत. दरम्यान लग्न आणि आई-वडील झाल्यानंतरची या सेलिब्रेटी जोडप्यांची ही त्याची पहिलीच दिवाळी आहे. या खासप्रसंगी, दिग्दर्शक-निर्माता विघ्नेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संपूर्ण कुटुंबासह फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.या शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये नयनतारा आणि विघ्नेश आपल्या जुळ्या मुलांसोबत पोज देत आहेत. सोबतच या जोडप्याने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. यंदाचं वर्ष नयनतारा आणि विघ्नेशसाठी फारच खास आहे. हे सतत त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिसून येत असतं. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये नयनताराने दिवाळीच्या निमित्ताने सुंदर गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तर पती विघ्नेशने मरुन रंगाचा कुर्ता आणि पांढरी लुंगी नेसली आहे. **(हे वाचा:** Bigg Boss फेम निक्की तांबोळीने दिली मोठी Good News; करणार नवी सुरुवात ) विघ्नेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी नयनतारा आणि आपल्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहलंय, ‘‘तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला सर्व प्रकारे शुभ दीपावली. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांमध्ये फक्त आनंद आणि शांती येवो. प्रेम हे प्रत्येकाचं आयुष्य सुंदर बनवतं. देवावर विश्वास ठेवा आणि प्रेम करा. सर्व काही व्यवस्थित चालेल याची खात्री विश्व नेहमीच देत असतं ‘. असं म्हणत विघ्नेशने दिवाळीनिमित्त फार मोठा संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे. या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सध्या हे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात

गरोदर असल्याची अफवा- काही दिवसांपासून नयनतारा गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. हे जोडपे काही मुलांसोबत वेळ घालवताना दिसले होते. तेव्हा मुलांसोबतचे स्वतःचे आणि नयनताराचे फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने लिहिले होते की, ‘तो भविष्यासाठी सराव करत आहे’. यानंतर अफवा सुरू झाल्या की हे जोडपे लवकरच बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर नयनतारा गरोदर असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता या जोडप्याने सरोगसीच्या मदतीने आपल्या बाळांचे स्वागत केल्याचे दिसून येत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नयनतारा-विघ्नेश लग्न- सध्या साऊथमधील नवं पॉवर कपल म्हणून ओळखलं जाणारं जोडपं नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचं लग्न एखाद्या परीकथेसारखं होतं. या दोघांची लव्हस्टोरी अनेकांना पसंत पडते. 9 जून 2022 रोजी महाबलीपुरमच्या आलिशान ठिकाणी हे लग्न पार पडलं होतं. चाहत्यांना लवकरच घरी बसून त्यांच्या लग्नाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करता येणार आहे. कारण नेटफ्लिक्स त्यांच्या लग्नाची डॉक्युमेंट्री रिलीज करणार असल्याचं म्हटलं जातं. या दोघांनी चेन्नईमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नात शाहरुख खान, ऍटली, रजनीकांत, अजित कुमार, बोनी कपूर आणि विजय सेतुपती यांच्यासह अनेकांनी उपस्थित लावली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात