मुंबई, 9 जून- बॉलिवूडसोबतच आता साऊथ इंडस्ट्रीमध्येसुद्धा (South Actress) लग्नसराई सुरु आहे. आदी पिनशेट्टीनंतर आता साऊथ अभिनेत्री नयनताराने (Nayanthara) फिल्ममेकर बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत (Vighnesh Shivan) लग्नगाठ (Wedding) बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची उत्सुकता होती. आज अखेर या जोडप्याने लग्नगाठ बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे. साऊथ चित्रपटसृष्टीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नयनताराला ओळखलं जातं. या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत तिच्या लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात. अभिनेत्री आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते. आज अभिनेत्रीने लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे.
On a scale of 10…
— VigneshShivan (@VigneshShivN) June 9, 2022
She’s Nayan & am the One ☝️☺️😍🥰
With God’s grace , the universe , all the blessings of our parents & best of friends
Jus married #Nayanthara ☺️😍🥰 #WikkiNayan #wikkinayanwedding pic.twitter.com/C7ySe17i8F
नयनतारा विघ्नेश शिवन आता अधिकृतपणे विवाहबद्ध झाले आहेत. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दोघांनी चेन्नईमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नात शाहरुख खान, ऍटली, रजनीकांत, अजित कुमार, बोनी कपूर आणि विजय सेतुपती यांच्यासह अनेकांनी उपस्थितलावली होती.

)







