मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; एके काळी हत्येचा आरोप असलेला साजिद नाडियाडवाला होता अखेरपर्यंत सोबत

दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; एके काळी हत्येचा आरोप असलेला साजिद नाडियाडवाला होता अखेरपर्यंत सोबत

दिव्या भारतीच्या वडिलांचा साजिदबरोबर तिने केलेल्या लग्नाला विरोध होता. दिव्याच्या अकाली निधनानंतर पती साजिद नाडियादवालावरही (Sajid Nadiadwala) हत्येचा संशय घेतला गेला होता.

दिव्या भारतीच्या वडिलांचा साजिदबरोबर तिने केलेल्या लग्नाला विरोध होता. दिव्याच्या अकाली निधनानंतर पती साजिद नाडियादवालावरही (Sajid Nadiadwala) हत्येचा संशय घेतला गेला होता.

दिव्या भारतीच्या वडिलांचा साजिदबरोबर तिने केलेल्या लग्नाला विरोध होता. दिव्याच्या अकाली निधनानंतर पती साजिद नाडियादवालावरही (Sajid Nadiadwala) हत्येचा संशय घेतला गेला होता.

  मुंबई, 1 नोव्हेंबर: दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचे वडील ओम प्रकाश भारती (Divya Bharti’s Father Passed away) यांचं निधन झालं आहे. 30 ऑक्टोबर रोजी ओम प्रकाश (Om Prakash Bharti) कालवश झाले; पण त्याबाबतची माहिती आज समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या भारतीच्या अकाली निधनानंतर, चित्रपट निर्माता आणि दिव्याचा पती साजिद नाडियादवालाच (Sajid Nadiadwala) तिच्या आई-वडिलांना सांभाळत होता. तो दिव्याच्या आई-वडिलांनाही ‘मॉम आणि डॅड’ असंच संबोधत होता. ओम प्रकाश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाही साजिद उपस्थित होता. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  दिव्या भारतीचं निधन होऊन आता 28 वर्षं झाली आहेत. वयाच्या 16 वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दिव्याने (Divya Bharti career) अवघ्या तीन वर्षांमध्ये अमाप लोकप्रियता मिळवली होती. कित्येक कलाकारांना दहा वर्षांमध्ये जेवढं नाव कमावता येत नाही, तेवढं तिनं वयाच्या 19 व्या वर्षीपर्यंत कमावलं होतं; मात्र 19व्या वर्षीच तिचं अपघाती निधन (Divya Bharti death) झालं.

  कोरोनाने आईवडील गमावेल... पुरकार मिळताच 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील अभिनेत्रीचे भावनिक पोस्ट

  घराच्या बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला होता. यानंतर साजिदवर तिच्या हत्येचा आरोपही ठेवण्यात आला; मात्र पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचं स्पष्ट केलं.

  ‘शोला और शबनम’ चित्रपटाच्या सेटवर साजिद आणि दिव्याची ओळख (Divya Bharti Sajid Nadiadwala marriage) झाली होती. साजिद कित्येक वेळा गोविंदाला भेटण्यासाठी सेटवर जात असे. त्या वेळी या दोघांची ओळख झाली. त्यानंतर एक दिवस दिव्याने अचाकन आपल्या आईला विचारलं, ‘तुला साजिद कसा वाटतो?’; त्यावर तो चांगला मुलगा असल्याचं तिच्या आईनं म्हटलं होतं. यानंतर काही दिवसांनी पुन्हा दिव्याने आईला विचारलं, ‘मी साजिदशी लग्न करू का?’; त्यावर तिच्या आईने याबाबत वडिलांशी बोलण्यास सांगितलं होतं. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत दिव्याच्या आईने याबाबत माहिती दिली होती.

  'Miss Kerala' विजेत्या अन् उपविजेत्या सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात

  दिव्या भारती अवघ्या 18 वर्षांची असताना या दोघांनी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे, दिव्याने आपल्या लग्नाची गोष्ट स्वतःच्या वडिलांपासून लपवून ठेवली होती.

  लग्नानंतर कित्येक महिने होऊन गेल्यावर तिच्या वडिलांना याबाबत समजलं होतं. दिव्याच्या आईने सांगितलं, “एक दिवस अचानक तिने फोन करून सांगितलं, की ती आणि साजिद लग्न करत आहेत. तिने मला साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी बोलावलं होतं; पण मी तिला नकार दिला. जोपर्यंत तू वडिलांना याबाबत सांगत नाहीस तोपर्यंत मी येणार नाही, असं मी तिला सांगितलं. तिच्या वडिलांचा या लग्नाला नकार होता; मात्र तरीही दोघांनी लग्न केलं.”

  लग्नानंतरही दिव्या आपल्या आई-वडिलांसोबतच राहत होती. साजिद अधून-मधून तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असे. त्यानंतर काही दिवसांनी दिवाळीनिमित्ताने दिव्याच्या घरी गेल्यानंतर साजिदने सर्वांना आपल्या लग्नाची माहिती दिली. त्या वेळी घरून विरोध झाला नाही. एकंदरीत सर्व सुरळीत सुरू होतं; मात्र 1993 मध्ये वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी दिव्याचं निधन झालं.

  यानंतर साजिदनेच दिव्याच्या आई-वडिलांना सांभाळलं. दिव्याचे वडील ओम प्रकाश यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत साजिद त्यांच्यासोबत होता. आता दिव्या आणि ओम प्रकाश हे दोघेही या जगात नाहीत, त्यामुळे साजिदच आता दिव्याच्या आईची काळजी घेईल.

  First published:

  Tags: Bollywood actress