Home /News /entertainment /

दिव्या अग्रवालचं वरुण सूदसोबत ब्रेकअप, लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच 4 वर्षांच नातं तुटलं

दिव्या अग्रवालचं वरुण सूदसोबत ब्रेकअप, लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच 4 वर्षांच नातं तुटलं

दिव्या अग्रवाल (Divya Agarwal ) आणि वरुण सूद( Varun Sood) टीव्ही विश्वातील चर्चित कपलपैकी एक आहे. मात्र या दोघांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  मुंबई, 6 मार्च-Divya Agarwal And Varun Sood break-up: दिव्या अग्रवाल (Divya Agarwal ) आणि वरुण सूद( Varun Sood) टीव्ही विश्वातील चर्चित कपलपैकी एक आहे. मात्र या दोघांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिव्या आणि वरूणचं ब्रेकअप झालं आहे. दिव्या अग्रवालनं सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. दिव्या अग्रवाल आणि वरूण सूद दोघेही नात्याबद्दल खूप सीरियस होते. मात्र हे कपल वेगळं झाल्याचं समोर आलं आहे. दोघांनी मिळून नुकतच एक घर देखील घेतलं होतं. दोघेही त्यांच्या नात्याला पुढं नेहण्याचा प्रयत्न करत होते. लवकरच नवीन घरात शिफ्ट देखील होणार होते. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा असतानाच चार वर्षांच नातं तुटल्याची बातमी समोर आली आहे. दिव्या अग्रवालने ररिवावरी इन्स्टावर एक पोस्ट करच वरूण सूदसोबत ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे. एक भावनिक पोस्ट करत तिनं एक फोटो पोस्ट केला आहे. दिव्यानं लिहिलं आहे की, आयुष्य एक सर्कस आहे. प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा मात्र कसलीही आशा मनात बाळगू नका. पण जेव्हा स्वतःवरील प्रेम कमी होऊ लागते तेव्हा काय होते..? नाही, माझ्यासोबत जे काही घडत आहे त्यासाठी मी इतर कोणाला दोष देत नाही... मला वाटते काम पूर्ण झाले आहे आणि ते ठीक आहे. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःसाठी जगायचे आहे. ठीक आहे! मी औपचारिकपणे घोषित करतो की, मी या जीवनात एकटीच आहे आणि मला जसे जगायचे आहे तसे जगण्यासाठी मला थोडा वेळ द्यावा लागेल.
  बिग बॉस ओटीट विजेती दिव्या अग्रवालनं पुढे म्हटलं आहे की, मोठे स्टेटमेंट देणं नेहमी गरजेचे नाही..कारण असणं आवश्यक नाही. यातून बाहेर पडणं फक्त माझी आवड..मर्जी आहे. मी वास्तवात मात्र त्याच्यासोबत घालवलेल्या प्रत्येत क्षणाला महत्त्व देते. मी त्याच्यावर प्रेम करते. तो एक चांगला मुलगा आहे. तो नेहमीच माझा बेस्ट फ्रेंड राहिल. कृपा करून माझ्या निर्णयाचा सन्मान करा. वाचा-बर्थडे गर्ल जान्हवी पोहचली तिरूपती दर्शनासाठी, तमिलियन लुकनं वेधलं लक्ष दिव्याची ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांसह त्यांच्या मित्रमंडळीला देखील धक्का बसला आहे. दिव्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्यांने लिहिले आहे की, 'माझं मन दुखतंय! आशा आहे की, तुम्हाला जगातील सर्व सुख मिळेल आणि एकमेकांकडे परत जाण्याचा मार्ग सापडेल!'
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या