मुंबई 5 एप्रिल**:** दया बेन (Daya ben) उर्फ दिशा वकानी (Disha Vakani) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या विनोदी मालिकेमुळं दिशानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आज तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा दया बेन या नावानंच अधिक ओळखळं जातं. सध्या ती तारक मेहतामध्ये कार्यरत नाही. मात्र तरी देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अलिकडेच तिनं आपल्या पहिल्या पगाराचा भन्नाट किस्सा सांगितला होता. कोईमोईला दिलेल्या मुलाखतीत दिशानं आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावळी तिनं आपल्या पहिल्या पगाराचा अनुभव सांगितला. तिनं गुजराती रंगभूमीवरुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असताना दिशानं एका व्यवसायिका नाटकात काम केलं होतं. या नाटकाचे तिने पाच प्रयोग केले होते. तिची भूमिका खूपच लहान होती. यासाठी तिला 250 रुपये पगार मिळाला होता. हे पैसे तिनं आपल्या वडिलांना दिले होते. तिचा पहिला पगार पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पैसे तिच्या वडिलांनी अद्याप खर्च केलेले नाहीत. ते त्यांनी एखाद्या पुरस्काराप्रमाणे फ्रेम करुन ठेवले आहेत. हा अनुभव सांगताना दिशा फारच भावूक झाली होती. अवश्य पाहा - आमिरच्या लेकीचं नाव ‘इरा’ नाही; ‘चुकीचं नाव उच्चारणाऱ्याला बसणार 5 हजारांचा दंड’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल 12 वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं फॅन फॉलोईंग आज कुठल्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. यावरुनच ‘तारक मेहता’ मालिकेच्या लोकप्रियता अंदाज आपल्याला येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.