मुंबई 5 एप्रिल**:** आमिर खानची (Amir Khan) मुलगी इरानं (Eyera) अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं नाही. तरी देखील एखाद्या सेलिब्रिटीला लाजवेल इतकं फॅन फॉलोइंग तिचं आहे. जगभरातील लाखो चाहते तिला फॉलो करतात. अन् ती देखील फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Amir Khan Daughter) मात्र यावेळी तिनं चाहत्यांबाबत एक तक्रार सांगितली आहे. प्रत्येक जण तिच्या नावाचा उच्चार चुकीचा करतो. अन् त्यामुळं आता तिला मानसिक त्रास होत आहे. जी मंडळी तिचं नाव चुकीचं घेतात त्यांना तब्बल 5 हजार रुपयांचा दंड बसवायला हवा अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. (How To Pronounce Her Name Eyera) आमिरच्या लेकीचं खरं नाव आहे तरी काय**?** आमिरच्या मुलीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं तिचं नाव चुकीच्या पद्धतीनं उच्चारलं जातं अशी तक्रार केली आहे. यामुळं तिचे मित्र-मैत्रीणीदेखील आता खिल्ली उडवू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये तिचं नाव नेमकं उच्चारावं तरी कसं हे तिनं सांगितलं आहे. “माझं नाव इरा नसून ते आयरा आहे. जो कुणी माझं नाव यापुढे चुकीचं उच्चारेल त्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन.” असं ती म्हणाली. अवश्य पाहा - दिव्याच्या भारतीच्या मृत्यूमुळं निर्माता अडकला होता संकटात; सेटवर घडायच्या विचित्र घटना
यापूर्वी आयरा तिच्या डिप्रेशनच्या व्हिडीओमुळं चर्चेत होती. “मी गेल्या वर्षांपासून नैराश्यात आहे. डॉक्टरांच्या मते मी क्लिनिकली ड्रिप्रेस आहे. पण आता मला बरं वाटतंय. नैराश्यात असलेल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे. पण काय करायचं ते अद्याप मी निश्चित केलेलं नाही. असो, पण तुम्ही आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करु नका. शरीरासोबतच मनाला देखील तंदुरुस्त करण्यासाठी काम करा.” अशा आशयाचा इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करुन इराने मानसिक स्वास्थ्याचं महत्व समजावून सांगितलं होतं.