मुंबई, 7 मार्च - अभिनेत्री दिशा पाटनी ( disha patani ) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे ती नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. काही लोक तिला तिच्या कपड्यावरून ट्रोल करताना देखील दिसतात. आता दिशा पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. दिशा रविवारी तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ सोबत डिनरला गेली होती. यावेळी मुंबईतील एका रेस्टॉरेंट बाहेर ती स्पॉट झाली. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचे ब्रालेट घातले होते. हे ब्रालाटे पाठीमागुन पूर्णपणे ओपन होते. यासोबतच तिनं पिवळ्या रंगाची प्रिंटेड पॅंट देखील घातली होती. रेस्टॉरेंटमधून बाहेर पडताना दिशा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. वाचा- रणवीरला ‘त्या’ अवस्थेत पाहून अभिनेत्रीनं व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाणच केलं बंद यानंतर सोशल मीडिया युजर्संनी दिशा पाटनीला ट्रोल करण्यास सुरू केले. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या डिनर डेटचा व्हिडिओ सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाला शेअर केला आहे. या व्हिडिओवर saurabhmishra3415 नावाच्या एका नेटकऱ्यांने कमेंट करत म्हटलं आहे की, ही ब्रा घालून रेस्टॉरेंटमध्ये पोहचली आहे. वाचा- गुलाबी साडी अन् गुलाबी ओठ…रूपालीच्या अदांनी नेटकऱ्यांना लावलयं वेड एकाने म्हटलं आहे की, हिची कपड्याची स्टाईल पाहूनच टायगर अभी जिंदा है..खरं प्रेम आहे मग जरा चांगले कपडे घालत जा…तर आणखी एकानं म्हटलं आहे की, प्रत्येकवेळी ही शो ऑफ करणारे असे ड्रेस का घालते? अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी दिशाला ट्रोल केलं आहे.
दिशाच्या कामाबद्दल सांगायचे तर तिनं नुकतचं ‘एक व्हिलेन रिटर्न्स’ या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. याची माहिती तिनं इन्स्टावर काही फोटो पोस्ट करत दिली होती. मोहित सूरीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात दिशासोबत अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2014 मध्ये आलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या सिनेमाचा हा सीक्वल आहे. असं जरी असलं तरी सिनेमाची कथा पूर्णपणे वेगळी आहे.

)







