मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बाहुबली फेम एसएस राजामौलीच्या 'RRR'चा न्यू लुक जारी; राम चरण दिसणार मुख्य भूमिकेत

बाहुबली फेम एसएस राजामौलीच्या 'RRR'चा न्यू लुक जारी; राम चरण दिसणार मुख्य भूमिकेत

दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटाचा न्यु लुक (RRR movie new look) जारी करण्यात आला आहे. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 26 मार्च: दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या बाहुबली (Director of Bahubali) चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीची परिभाषा बदलली होती. त्यांच्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं होतं. त्याचबरोबर बाहुबली चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अशा या गुणवान दिग्दर्शकाचा 'RRR' हा  सिनेमा (RRR Movie) गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. अशातच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या राम चरणच्या (Ram Charan) वाढदिवसाच्या मुहर्तावर या चित्रपटाचा न्यु लुक (New look) जारी करण्यात आला आहे. दक्षिणात्य अभिनेता राम चरण चा वाढदिवस उद्या 27 मार्च रोजी आहे.

दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांच्या टीमने शुक्रवारी  RRR चित्रपटाचा न्यु लुक जारी केला आहे. या चित्रपटात राम चरण अल्लूरी सीता रामाराजूची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा जबरदस्त लुक पाहून चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राम चरणच्या या शानदार लुकवरून या चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज घेतला जावू शकतो. या पोस्टरमध्ये राम चरणने नारंगी धोती परिधान केली असून हातात धनुष्य घेवून आकाशाच्या दिशेनं बाण रोखला आहे. त्यामुळे राम चरणच्या  व्यक्तिरेखेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

चाहत्यांना राम चरणचा हा लूक प्रचंड आवडत आहे. आतापर्यंत राम चरणने अशा प्रकारची भूमिका साकारली नाही, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून राम चरण चाहत्यांना एका वेगळ्या पेहरावत पाहायला मिळणार आहे. एस. एस. राजामौली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून RRR चा न्यु लूक शेअर केला आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की - 'शौर्य, सन्मान आणि अखंडतेचा नायक. आरआरआर चित्रपटातील अल्लूरी सीतारामा राजूला सर्वासाठी घेवून येत आहे. '

हे ही वाचा -चित्रपट निर्मात्यानं केली होती विचित्र मागणी; प्रियांका चोप्रानं केला खुलासा

या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता राम चरण सोबतच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री आलिया भट्ट, समुथिरकानी आणि एलीसन डूडी यासारखे बडे कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये या चित्रपटात चर्चा सुरू आहे. हा बहुचर्चित चित्रपट 13 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

First published:

Tags: South film, SS Rajamouli