Home /News /entertainment /

जान्हवीचा पहिलाच आयटम साँग पाहून प्रेक्षक झाले अवाक; तुम्हाला कसा वाटतोय पाहा

जान्हवीचा पहिलाच आयटम साँग पाहून प्रेक्षक झाले अवाक; तुम्हाला कसा वाटतोय पाहा

‘नदियो पार’ (Item Song Nadiyon Paar) हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यामध्ये जान्हवी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिचा हा आयटम साँग (Janhvi Kapoor First Item Song) पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.

  मुंबई 3 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जान्हवीच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘रुही’ (Roohi) असं आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘नदियो पार’ (Item Song Nadiyon Paar) हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यामध्ये जान्हवी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिचा हा आयटम साँग (Janhvi Kapoor First Item Song) पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ‘नदियो पार’ हे जान्हवीचं पहिलंच आयटम साँग आहे. या गाण्यात जान्हवीच्या मादक पाहायला मिळत आहेत. या गाण्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या गाण्यातील जान्हवीच्या अदाकारीने तर चाहत्यांना पुरतं घायाळ केलंय. ‘नदियो पार’चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. काही तासांत 20 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
  अवश्य पाहा - आईच्या आठवणीत जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट; हस्ताक्षरातील चिठ्ठी केली शेअर गोल्डन ड्रेसमधील जान्हवीचा हॉट लूक आणि तिच्या जबरदस्त डान्सनं अनेकांना वेड लावलं आहे. जान्हवीनं तिच्या आयटम साँगचा व्हिडीओ इन्स्टाग्रावरही पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफने हार्ड आणि फायरचं इमोजी कमेंटमध्ये देत जान्हवीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. 2004 मध्ये ‘नदियो पार’ या गाण्यानं धुमाकुळ घातला होता. यानंतर ‘रुही’ सिनेमासाठी हे गाणं रीकंपोज करण्यात आलंय. शामूरनेच हे गाणं पुन्हा गायलं आहे.
  ‘रुही’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजय यांनं केली आहे. यापूर्वी त्यानं ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाची  निर्मिती केली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या