मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mani Ratnam: दिग्दर्शक मणिरत्नम रुग्णालयात दाखल, समोर आली मोठी अपडेट

Mani Ratnam: दिग्दर्शक मणिरत्नम रुग्णालयात दाखल, समोर आली मोठी अपडेट

 बॉलिवूड-साऊथ दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बॉलिवूड-साऊथ दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बॉलिवूड-साऊथ दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई,19 जुलै- मनोरंजनसृष्टीत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. बॉलिवूड-साऊथ दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचं पत्नी सुहासिनी यांनी सांगितलं आहे. मणिरत्नम सध्या आपल्या आगामी 'पेन्नीयन सेल्व्हन' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन काम सुरु असतानाच आता दिग्दर्शकाला कोरोनाची लग्न झाल्याचं समोर आलं आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, मणिरत्नम यांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी त्यांच्यात उपचार सुरु आहेत. नुकतंच 8 जुलैला 'पेन्नीयन सेल्व्हन' या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. या इव्हेन्टदरम्यान मणिरत्नम दिसून आले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार चर्चा सुरु असतानाच आता मणिरत्नम यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. (हे वाचा:Deepika Padukone: 'ब्रह्मास्त्र' मध्ये दीपिका पादुकोणची एन्ट्री; रणबीरची X-गर्लफ्रेंड साकारणार 'ही' भूमिका? ) मणिरत्नम यांचा बहुचर्चित 'पेन्नीयन सेल्व्हन' हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा दिसणार आहे. सोबतच या चित्रपटात चियान विक्रम, त्रिशा, कार्ती,शोभिता धूलिपाला, प्रकाशराज, जयम रवी हेसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Covid19, Entertainment

    पुढील बातम्या