जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Dilip Kumar : ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांचं खरं नाव माहितीये का? 'या' भीतीमुळे बदललेलं

Dilip Kumar : ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांचं खरं नाव माहितीये का? 'या' भीतीमुळे बदललेलं

दिलीप कुमार

दिलीप कुमार

बॉलिवूडचे दिग्गज, ट्रॅजेडी किंग, अभिनयाची सेल्फ-मूव्हिंग स्कूल, अशा अनेक नावांनी सन्मानित झालेले दिवंगत अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. त्यांची आज रविवारी 100 वी जयंती साजरी होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : बॉलिवूडचे दिग्गज, ट्रॅजेडी किंग, अभिनयाची सेल्फ-मूव्हिंग स्कूल, अशा अनेक नावांनी सन्मानित झालेले दिवंगत अभिनेते म्हणजे दिलीप कुमार . त्यांची आज रविवारी 100 वी जयंती साजरी होत आहे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे चित्रपट आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा एक कलाकार होता ज्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीचा चेहराच बदलून टाकला होता. आज त्यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानातील पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजारच्या अरुंद गल्ल्यांमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान होते. युसूफ खान दिलीप कुमार बनण्यामागील कथा त्याच्या फिल्मी करिअरशी जोडली गेलेली आहे. दिलीप कुमार हे त्यांचे चित्रपटाचे नाव होते, जे प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती देविका राणी यांनी दिले होते. हेही वाचा -  Dilip kumar: जेव्हा दिलीप कुमारांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन धावले होते अमिताभ बच्चन दिलीप कुमार यांनी त्यांच्या ‘दिलीप कुमार: द सबस्टन्स अँड द शॅडो’ या आत्मचरित्रात नाव बदलण्याची कहाणी लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, 1944 मध्ये जेव्हा त्यांचा ‘ज्वार भाटा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार अभिनेत्री देविका राणी यांनी युसूफ खानची ओळख दिलीप कुमारच्या रुपात करून दिली. देविका म्हणाली की, पडद्यावर दिसणार्‍या तुमच्या रोमँटिक इमेजनुसार तुम्हाला हे नाव सुट करेल. णि दिलीप कुमार यांना त्यांची कल्पना आवडली आणि त्यांनी होकार दिला. त्यांनी दिलीप कुमार या नावाने आपली फिल्मी कारकीर्द सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिलीप कुमार यांनी नाव बदलण्यामागे आणखी एक किस्सा दडलेला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, माझे वडील चित्रपटांच्या विरोधात होते. त्यांचा एक चांगला मित्र होता, ज्याचे नाव लाला बन्सीनाथ होते. त्यांची मुलं चित्रपटात काम करायची. माझे वडील अनेकदा त्यांच्याकडे तक्रार करायचे की तू हे काय केलंस. तुमचा तरुण आणि निरोगी मुलगा काय करतोय. दिलीप कुमार म्हणाले, जेव्हा मी चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा मला खूप भीती वाटत होती की त्यांना कधी कळेल, ते खूप रागावतील, मारतील. त्यामुळेही मी नाव बदललं.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान,  56 वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी एकापेक्षा एक अविस्मरणीय चित्रपट दिले. 1950 आणि 1960 हे दशक त्यांच्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. 1949 मध्ये मेहबूब खान यांच्या अंदाज या चित्रपटातून दिलीप कुमार स्टार झाले. दिलीप कुमार यांनी ‘पैगम’, ‘राम और श्याम’, ‘आन’, ‘कोहिनूर’ आणि ‘मुगल-ए-आझम’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभिनय कौशल्या दाखवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात