जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मला अचानक पाठीमागून धरलं आणि...' अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला Shocking अनुभव

'मला अचानक पाठीमागून धरलं आणि...' अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला Shocking अनुभव

'मला अचानक पाठीमागून धरलं आणि...' अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला Shocking अनुभव

‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) मधून घराघरात पोहचलेला ‘सुज्या’ (Sujya) अर्थातच अभिनेता सुव्रत जोशीने (Suvrat Joshi) अगदी कमी वेळेत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे-  ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) मधून घराघरात पोहचलेला ‘सुज्या’ (Sujya)  अर्थातच अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi). या मालिकेने सुव्रतला खुपचं प्रसिद्धी मिळवून दिली होती. काही दिवसांपूर्वीच सुव्रत आणि अभिने सखी गोखले (Sakhi Gokhale) या दाम्पत्याने एका युट्युब चॅनेलला भेट दिली होती. यावेळी सुव्रतने आपले काही किस्से चाहत्यांशी शेयर केले आहेत. त्यातीलचं एक किस्सा आज आपण पाहणार आहोत. सुव्रतने मुलाखती दरम्यान आपल्यासोबत घडलेला एक आश्चर्यकारक किस्सा सांगितला आहे. यावेळी बोलतांना सुव्रत म्हणतो, ‘मी एका नाटकाच्या प्रयोगात होतो, त्यावेळी माझा एक सीन अगदी प्रेक्षकांमध्ये होता. मी प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन एका खुर्चीवर बसलो होतो. त्यावेळी नाट्यगृहातल्या सर्व लाईटस बंद होत्या. आणि मी हातात एक बॅटरी घेऊन खुर्चीत बसून माझा सीन करत होतो. इतक्यात मला असं जाणवल की मला पाठीमागून कोणी तरी ओढत आहे. पुणे पॉडकास्ट या युट्यूब चॅनेलशी बोलताना सुव्रतने हा किस्सा शेअर केला आहे.

आणि मला काही समजायच्या आतचं मला पाठीमागून घट्ट पकडलं गेलं. दोन्ही हातांनी धरण्यात आलं. आणि त्यानंतर जोराने माझे गालगुच्छे घ्यायला सुरुवात केली. मी अगदी भांबावून गेलो. मला काहीच समजत नव्हत माझ्या सोबत हे काय होतंय. त्यांनतर नाट्यगृहातील लाईट लावण्यात आल्या’. (हे वाचा: PHOTOS : मराठीचं नव्हे तमिळमध्ये सुद्धा केलंय काम, श्रुती मराठेच्या दिलखेच अदा ) त्यावेळी नाट्यगृहातील सर्व लोक हसत होते. मी मात्र अजूनही शॉक मध्ये होतो. हे माझ्यासोबत असं काही झालं हे मला अजूनही विश्वास बसत नव्हता. आणि महत्वाचं म्हणजे त्या एक वयस्कर गृहिणी होत्या. मी त्यांना सहजपणे काकी म्हणेन असं त्यांच वय होतं. हा प्रसंग माझ्यासोबत घडला. त्यामुळे हे सर्व हसण्यावारी घेण्यात आलं. (हे वाचा: श्वेता तिवारीच्या Ex-नवऱ्याचा ड्रामा! मुलाला हिसकावून घेण्याची घटना CCTVत कैद   ) मात्र हा प्रसंग एखाद्या अभिनेत्री सोबत घडला असता, तर मात्र तिच्यावर अतिप्रसंग झाला. असं तुम्ही म्हटला असता. मात्र अभिनेत्यांसोबत सुद्धा असे प्रसंग घडतात. तेव्हा आम्ही काय करायचं, असं सुव्रत म्हणाला. मात्र हा प्रसंग त्याने सुद्धा शेवटी हसण्यावारी निभावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात