Home /News /entertainment /

VIDEO: श्वेता तिवारीच्या Ex-नवऱ्याने केला लज्जास्पद प्रकार, मुलाला हिसकावून घेण्याचा प्रकार CCTV मध्ये कैद

VIDEO: श्वेता तिवारीच्या Ex-नवऱ्याने केला लज्जास्पद प्रकार, मुलाला हिसकावून घेण्याचा प्रकार CCTV मध्ये कैद

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पूर्वीचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यातील प्रचंड मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. त्याचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागत आहेत. त्यांच्या अशाच एका भांडणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 11 मे: अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पूर्वीचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यातील प्रचंड मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. त्याचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागत आहेत. श्वेता एकल पालकाच्या भूमिकेतून मुलगी पलक (Palak) आणि मुलगा रेयांश (Reyansh) यांचा सांभाळ करते आहे. मात्र रेयांशच्या पालनपोषणावरून अभिनव आणि श्वेता यांच्यातला तणाव वाढला आहे. मुलगा रेयांश आपल्यासोबत राहावा, अशी अभिनवची इच्छा आहे, असं वृत्त काही माध्यमांत आलं आहे. श्वेता मात्र म्हणते, की रेयांशला अभिनव चांगल्या पद्धतीने सांभाळू शकणार नाही. त्याच्या सुरक्षिततेची चिंता श्वेताला आहे. आपली चिंता खोटी नाही, हे सिद्ध करण्यासाठी श्वेता तिवारीने आपल्या सोसायटीचं एक सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केलं आहे. त्यात अभिनव श्वेताकडून रेयांशला ओढून घेत असल्याचं दिसून येत आहे. या लाजिरवाण्या घटनेच्या आधारे श्वेता अभिनववर आरोप करत आहे. दरम्यान, अभिनवचा असा आरोप आहे, की श्वेता त्याला मुलाशी भेटू देत नाही. हे वाचा-'लस घ्यायला चुकून सुद्धा इथे जाऊ नका'; 'देवमाणसा'ने दिलाय इशारा श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फूटेजसोबत लिहिलं आहे, 'आता सत्य पुढे आलंच पाहिजे. (हे माझ्या अकाउंटवर जास्त काळ राहणार नाही. मी थोड्या वेळाने ते डिलीट करणार आहे. मी आता हे अशासाठी पोस्ट करत आहे, की सत्य पुढे यावं) माझा मुलगा अभिनवला का घाबरतो, त्याचं कारण पुढे आलं आहे.'
'या घटनेनंतर महिनाभर माझा मुलगा घाबरत होता. तो इतका घाबरलाय, की रात्री नीट झोपतही नाही. त्याचा हात दोन आठवडे दुखत होता. आता तो त्याचे वडील घरी आले तर किंवा त्यांची भेट झाली तर घाबरतो. मी माझ्या मुलाला या मानसिक चिंतेला सामोरं जाऊ देणार नाही. मी त्याला शांत करण्यासाठी आणि खूश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करीन; पण हा भयानक माणूस माझ्या मुलाच्या मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवतो आहे. हे दुर्वर्तन नाही, तर काय आहे? हे माझा सोसायटीचं सीसीटीव्ही फूटेज आहे,' असंही श्वेताने पुढे लिहिलं आहे. हे वाचा-'आज मला शांत झोप लागेल', कोरोनामुक्त प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं मोठं काम अभिनव मुलाचा ताबा (Custody) मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे; मात्र श्वेता यासाठी अजिबात तयार नाही. ती अभिनवपासून मुलाला दूर ठेवू इच्छिते; मात्र अभिनव त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत राहतो, असं तिचं म्हणणं आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Actress, Shweta tiwari

पुढील बातम्या