जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / घटस्फोटानंतर मलायकाला अरबाजकडून मिळालेली 15 कोटींची पोटगी? अभिनेत्रीनं स्वतः सांगितलं सत्य

घटस्फोटानंतर मलायकाला अरबाजकडून मिळालेली 15 कोटींची पोटगी? अभिनेत्रीनं स्वतः सांगितलं सत्य

घटस्फोटानंतर मलायकाला अरबाजकडून मिळालेली 15 कोटींची पोटगी? अभिनेत्रीनं स्वतः सांगितलं सत्य

मलायका अरोरा आणि अरबाज खान या दाम्पत्याने 2017 मध्ये परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. खरं तर, याबाबतची घोषणा त्यांनी 2016 मध्ये केली होती. त्यानंतर एका वर्षाच्या आतच दोघं विभक्त झाले

    नवी दिल्ली 07 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर आणि फॅशन दिवा मलायका अरोरा (Malaika Arora) खास ड्रेसिंग, फिटनेस (Fitness) आदी गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असते. चित्रपटांमधली तिची खास नृत्यशैली प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालते. `छय्या-छय्या`, `माही वे`, `मुन्नी बदनाम हुई` ही तिची गाणी प्रचंड गाजली आहेत. ती सध्या छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोजमध्ये (Reality Show) जजच्या भूमिकेत दिसत आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावरही (Social Media) सक्रिय असते. तिच्या पोस्टही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) याच्याशी मलायका विवाहबद्ध झाली होती. दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 1998 मध्ये विवाह केला. या दाम्पत्याला अरहान नावाचा मुलगादेखील आहे. काही कालावधीनंतर मलायका आणि अरबाजने परस्पर सहमतीनं घटस्फोट (Divorce) घेतला. यावेळी मलायकानं अरबाजकडून 15 कोटी रुपयांची पोटगी (Alimony) घेतल्याचं वृ्त्त होतं. त्यामुळे या रकमेविषयी चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. पण सत्य परिस्थिती काहीशी वेगळी आहे. या विषयावर खुद्द मलायकानंही भाष्य केलं होतं. या विषयीची बातमी `एबीपी लाइव्ह`ने दिली आहे. रणवीरला ‘त्या’ अवस्थेत पाहून अभिनेत्रीनं व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाणच केलं बंद मलायका अरोरा आणि अरबाज खान या दाम्पत्याने 2017 मध्ये परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. खरं तर, याबाबतची घोषणा त्यांनी 2016 मध्ये केली होती. त्यानंतर एका वर्षाच्या आतच दोघं विभक्त झाले. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने त्याच्याकडून 15 कोटींची पोटगी घेतल्याचं वृत्त होतं. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. एवढी मोठी रक्कम ऐकून अनेकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केलं. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका नव्या घरात शिफ्ट झाली. ती तिचा मुलगा अरहानसोबत रहात होती. अरहान नुकताच उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. या जोडीचीही चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षात असेल ही अभिनेत्री, ओळखा कोण ती? मलायकाचा घटस्फोट आणि पोटगीविषयी बोलताना तिच्या वकिलांनी सांगितलं की, ``घटस्फोट आणि पोटगी हे विषय खूप गोपनीय आणि खासगी असतात. त्याविषयी अन्य व्यक्तींनी अंदाज लावणं चुकीचं आहे.`` 15 कोटींच्या पोटगीबाबतच्या वृत्तावर मलायकानं देखील प्रतिक्रिया दिली होती. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, मलायकानं या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. ``मी अरबाज खानकडे कोणत्याही प्रकारची पोटगी मागितली नाही, ही अफवा आहे,`` असं तिनं सांगितलं होतं. एकूणच ही रक्कम आणि या सेलेब्रिटी जोडीचा घटस्फोट याची जोरदार चर्चा अजूनही सोशल मीडियावर होत असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात