अभिनेत्री मलायका अरोरा सध्या फार चर्चेत असते. पण आताच नाही तर मलायकाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातही तिचा बोलबाला कायम होता. पाहा तिचे हटके फोटो. मलायका आता फारच फिट आहे. पण त्या काळातही ती फारच हॉट होती. मलायकाने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. मॉडेलिंग नंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मलायका आपल्या हॉटनेससाठी त्या काळातही फार प्रसिद्ध होती. त्यावेळी मलायकाची एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळख होती. अनेक चित्रपटांसाठी तिने आयटम साँगही केले आहेत. चल छैय्या छैय्या हे गाणं फारच हीट ठरलं होतं. मलायकाने १९९८ साली अभिनेता अरबाज खानसोबत विवाह केला होता. त्यानंतर काही काळ तिने ब्रेक घेतला होता. सध्या मलायका तिच्या फिटनेसमुळे पुन्हा तरूण झाली असल्याचं म्हटलं जातं. सध्या ती कोणत्याही चित्रपटात किंवा मॉडेल म्हणूनही सक्रिय नसली तरीही तिच्या अर्जून कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे ती फारच चर्चेत असते.