मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'लता दीदींच्या अंत्यदर्शनात जाण्यासाठी मी 3 वेळा स्वतःला तयार केलं' परंतु... 'He-Man'धर्मेंद्र यांचा मोठा खुलासा

'लता दीदींच्या अंत्यदर्शनात जाण्यासाठी मी 3 वेळा स्वतःला तयार केलं' परंतु... 'He-Man'धर्मेंद्र यांचा मोठा खुलासा

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र   (Dharmendra) दीदींना  निरोप देण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. आता धर्मेंद्र यांनी याचं कारण उघड केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) दीदींना निरोप देण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. आता धर्मेंद्र यांनी याचं कारण उघड केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) दीदींना निरोप देण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. आता धर्मेंद्र यांनी याचं कारण उघड केलं आहे.

मुंबई, 8 फेब्रुवारी-  गानकोकिळा लता मंगेशकर  (Lata Mangeshkar)  यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला . त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारात संपूर्ण बॉलिवूड श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचला होता. पण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र   (Dharmendra)  त्यांना निरोप देण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. आता धर्मेंद्र यांनी याचं कारण उघड केलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, लता मंगेशकर यांना आदरांजली देण्यासाठी मी एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा तयार झालो होतो. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण...

धर्मेंद्र यांनी ETimes ला दिलेल्यामुलाखतीत म्हटलं आहे, “मी खूप अस्वस्थ होतो. मी दीदींच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी एकदा नव्हे तर तीनदा तयार झालो होतो. परंतु माझी हिम्मत नाही झाली. प्रत्येक वेळी मी स्वतःला मागे खेचलं. दीदींनी आम्हाला सोडून जावं असं मला वाटत नव्हतं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप अस्वस्थ आणि वाईट वाटत होतं.

धर्मेंद्र पुढे म्हणाले, "मला तुम्हाला हे देखील सांगायचं आहे की कधीकधी त्या मला भेटवस्तू देखील पाठवत असत. त्यांच्याकडून मला प्रचंड प्रेरणा मिळे. त्या मला नेहमी सांगत 'मजबूत राहा.' मला आठवतं की मी एकदा ट्विटरवर एक दुःखी पोस्ट लिहिली होती. आणि त्यांनी लगेच मला फोन केला आणि विचारलं की मी ठीक आहे का? आणि त्या 30 मिनिटांसाठी माझ्याशी बोलल्या होत्या. आम्ही बऱ्याचदा 25-30 मिनिटे फोनवर गप्पा मारायचो. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं."

(हे वाचा:अमिताभ लतादीदींबद्दल बोलताना रेखाची होती ही रिअ‍ॅक्शन, VIRAL VIDEO ची चर्चा )

धर्मेंद्र पुढे म्हणाले, “मी तुम्हाला आणखी एक घटना सांगतो, ज्यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा माझ्यावर किती जीव होता. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की, जेव्हा त्या मला पहिल्यांदा भेटल्या तेव्हा मी तपकिरी रंगाचा शर्ट घातला होता. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो. काय दिवस होते ते!'

First published:

Tags: Dharmendra deol, Entertainment, Lata Mangeshkar - लता मंगेशकर