मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमिताभ लतादीदींबद्दल बोलताना रेखाची होती ही रिअ‍ॅक्शन, VIRAL VIDEO ची सोशल मीडियावर चर्चा

अमिताभ लतादीदींबद्दल बोलताना रेखाची होती ही रिअ‍ॅक्शन, VIRAL VIDEO ची सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan)  यांनीसुद्धा एक खास व्हिडीओ शेअर   (Viral Video) करत दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान हा व्हिडीओ आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. पाहूया या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 फेब्रुवारी-   गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी निधन झालं. कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेली अनेक दिवस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. दीदींच्या जाण्याने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला आहे. अनेकजण दीदींच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत त्यांना आदरांजली वाहात आहेत. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan)  यांनीसुद्धा एक खास व्हिडीओ शेअर   (Viral Video) करत दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान हा व्हिडीओ आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. पाहूया या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे.

बॉलिवूड शहेंशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच जुना असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोनी टीव्हीवर झालेल्या एका पुरस्कार सोहळ्याचा असल्याचं लक्षात येत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये लता दीदीसुद्धा आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, ते स्टेजवर उभे राहून लता दीदींबद्दल बोलताना दिसून येत आहेत. अमिताभ यामध्ये सांगतात लता मंगेशकर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांचा आवाजच त्यांची ओळख आहे. त्यांचा आवाज फक्त देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक दैवी भेट आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांच्याबद्दल काहीही बोलण्या इतपत माझी पात्रता नाही असेही बिग बी म्हणतात. अमिताभ बच्चन ज्यावेळी स्टेजवर उभं राहून बोलत असतात त्यावेळी रेखा अतिशय आनंदाने आणि लक्षपूर्वक त्यांना न्याहाळत असतात. ही गोष्ट कॅमेऱ्यामध्ये अगदी अचूक टिपली गेली आहे. आणि याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. यावेळी रेखा यांच्या जवळ अभिनेत्री राणी मुखर्जी बसलेली दिसून येत आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्हस्टोरी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध लव्हस्टोरींपैकी एक आहे. कित्येक पिढ्या त्यांच्याबद्दल अगदी उत्सुकतेने बोलतात आणि ऐकतात. त्यांनीच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. शूटिंग दरम्यानच ते एकेमकांच्या जवळ आल्याचं म्हटलं जातं. परंतु अमिताभ यांचं आधीपासून जया सोबत लग्न झालेलं होतं, त्यामुळे त्यांचं हे नातं संपुष्टात आल्याचं म्हटलं जातं. परंतु अमिताभ आणि रेखा यांनी कधीच आपलं नातं कोणा समोरही मान्य केलं नव्हतं.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Lata Mangeshkar - लता मंगेशकर, Rekha