मुंबई, 09 मे: दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe movie) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. दरम्यान एकंदरितच आता मराठी चित्रपट देखील प्रमोशनसाठी विशेष वेळ देत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे विविध क्लुप्त्या प्रमोशनसाठी वापरल्या जात आहे. ‘धर्मवीर’चे प्रमोशन देखील अनोख्या पद्धतीने केले जात आहे. आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचे सर्वात मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या पोस्टनुसार हे आशियातील सर्वात मोठे होर्डिंग आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. प्रसाद ओकने केली इन्स्टाग्राम पोस्ट अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘प्रचंड अभिमान. आशियातल्या सर्वात मोठ्ठया होर्डिंगवर “धर्मवीर” अवतरले आहेत…!!! “धर्मवीर”, 13 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात…!!! एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा ‘धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे’.
महाराष्ट्रातील विविध भागात या सिनेमाच्या पोस्टरचे 30 फुटी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. पण या मुंबईच्या वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील होर्डिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे होर्डिंग आशियातील सर्वात मोठे होर्डिंग असून ते 16800 स्क्वेअर फुट आकाराचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार याठिकाणी कधी मराठी मुव्हीचे पोस्टर झळकले नव्हते, पण धर्मवीरने हा इतिहास घडवला आहे. हे वाचा- ‘2 मुलांचा मृत्यू झाला पण दिघेंनी मला घडवलं’, एकनाथ शिंदेंनी दिला आठवणींना उजाळा ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर प्रविण तरडे (Pravin Tarde) आता हा ‘धर्मवीर’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण करणार आहेत. तर झी स्टुडिओज, साहिल मोशन आर्ट्स आणि मंगेश देसाईंनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत असून प्रसादचा पहिला लुकसमोर आल्यापासून चाहते उत्सुक आहेत. ठाण्यातही या सिनेमाचे मोठे पोस्टर लागले आहेत. प्रसाद ओकमध्ये दिघे साहेबांचा भास होत असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. ट्रेलर लाँचवेळी देखील प्रसाद ओक आनंद दिघेंच्या रुपातच दिसला होता, त्यावेळीही त्याने मान्यवरांकडून प्रशंसा मिळवली.

)







