Home /News /entertainment /

'खोटे आरोप लावणे बंद करा' धनुष आमचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या जोडप्याला अभिनेत्याने पाठवलं नोटीस

'खोटे आरोप लावणे बंद करा' धनुष आमचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या जोडप्याला अभिनेत्याने पाठवलं नोटीस

मदुराईच्या असलेल्या आर. काथीरेसन आणि त्यांच्या पत्नी के. मीनाक्षी या जोडप्याने अभिनेता धनुष (Dhanush) हा त्यांचा मुलगा असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता.

    मुंबई, 21 मे-  मदुराईच्या असलेल्या आर. काथीरेसन आणि त्यांच्या पत्नी के. मीनाक्षी या जोडप्याने अभिनेता धनुष (Dhanush) हा त्यांचा मुलगा असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी  केला होता. हे प्रकरण जवळपास पाच वर्ष जुनं आहे. ज्याबाबत मद्रास हायकोर्टाकडून अभिनेता धनुषला समन पाठवण्यात आला होता. कोर्टाचं समन मिळाल्यानंतर धनुषने सुद्धा आता या जोडप्याविरोधात अॅक्शन घेतली आहे. या जोडप्याचं बोलणं फेटाळत धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजाने त्यांना लीगल नोटीस पाठवली आहे. धनुषच्या वतीने ही कायदेशीर नोटीस त्याचे वकील एस हाजा मोहिद्दीन गिश्ती यांनी पाठवली आहे. नोटीसद्वारे या जोडप्याला धनुषबद्दल अशा खोट्या गोष्टी सांगणं थांबवण्यास सांगण्यात आलं आहे. असे खोटे आरोप लावणे बंद करा. तुम्ही असे न केल्यास, माझे क्लायंट त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात जातील. तुम्ही लावलेले बदनामीकारक आरोप त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतात, ज्यासाठी तुमच्यावर बदनामीचा खटला भरला जाईल, असे या जोडप्याला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. वाचा-लग्नाला न आल्याने ह्रताच्या सासूने भरला अंजिक्यला दम, म्हणाल्या आता... काय आहे हे प्रकरण? मदुराईच्या असलेल्या आर. काथीरेसन आणि त्यांच्या पत्नी के. मीनाक्षी या जोडप्यानेकाही दिवसांपूर्वी अभिनेता धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. धनुष हा त्यांचा तिसरा मुलगा आहे, शिवाय तो चित्रपटात काम करण्यासाठी घरातून पळून गेला होता. धनुषने चुकीचा नमुना चाचणी अहवाल न्यायालयात सादर केल्याचा आरोप कथिरेसन यांनी केला आहे. हे प्रकरण सुमारे 5 वर्षे जुने आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood

    पुढील बातम्या