जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / धनुषला हे काय झालं, कशासाठी केलं टक्कल? लूकनं वेधलं लक्ष

धनुषला हे काय झालं, कशासाठी केलं टक्कल? लूकनं वेधलं लक्ष

धनुषला हे काय झालं, कशासाठी केलं टक्कल?  लूकनं वेधलं लक्ष

धनुषला हे काय झालं, कशासाठी केलं टक्कल? लूकनं वेधलं लक्ष

मागच्या काही दिवसात धनुषचा एअरपोर्ट लूक व्हायरल झाला होता. आता धनुष पुन्हा एकदा त्याच्या नवीन लूकनं चर्चेत आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 जुलै- मागच्या काही दिवसात धनुषचा एअरपोर्ट लूक व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने कॅज्युअल पँट व हुडी घातली होती, तसेच डोळ्यांवर त्याने गॉगल लावला होता. त्याचे केस वाढलेले दिसत होते व दाढीही वाढलेली दिसत होती. त्याचा हा असा अवतार पाहून चाहते मात्र आश्चर्यचकित झाले होते. आता धनुष पुन्हा एकदा त्याच्या नवीन लूकनं चर्चेत आला आहे. नुकतेच तो तिरुपती मंदिरात मुलांसोबत दिसला आणि यावेळी त्याने टक्कल केल्याचे दिसले. लोकांना त्याला अशा अवतारात पाहून ओळखनं देखील कठीण झाले. आता धनुषचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर दहशत निर्माण करणारे धनुषचे फोटो तिरुपती मंदिरातील आहेत. धनुष आपल्या दोन मुलांसह यात्रा आणि लिंगा यांच्यासोबत मंदिरात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत आई-वडील कस्तुरी राजा आणि विजयालक्ष्मीही होते. धनुषने सकाळी मंदिरात दर्शन घेतले. तेथे त्याने दाढी आणि केस कापले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या धनुषच्या फोटोंमध्ये तो रुद्राक्ष माळा, मास्क घातलेला दिसत आहे. वाचा- स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला ‘त्या’ पवित्र ठिकाणी पोहचला सुबोध भावे इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेले धनुषचे फोटो पाहून ते धनुषच्या आगामी चित्रपटाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनुसार, धनुष लवकरच ‘D50’ चित्रपटात दिसणार असून या चित्रपटासाठी धनुषने हा नवा लूक केला आहे. ‘कॅप्टन मिलर’ हा चित्रपट 1930 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण मतेश्वरन यांनी केले आहे. धनुषसोबत या चित्रपटात कन्नड अभिनेता शिवा राजकुमार आणि तमिळ स्टार सुदीप किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रियांका अरुल मोहन मुख्य अभिनेत्री आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असला तरी त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

धनुषच्या कॅप्टन मिलर या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा फर्स्ट लूक ३० जून रोजी शेअर करण्यात आला आहे,ज्यामध्ये अनेक जवानांचे मृतदेह शेतात जमिनीवर पडलेले दिसत आहेत आणि धनुष तिथे उभा असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात धनुष एका सैनिकाच्या भूमिकेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात